अजूनही रेल्वे पोलिसांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का ?

अजूनही रेल्वे पोलिसांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का ?



  मोबाईल चोरटे आणि फटका  गॅँग सक्रीयच


    डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना काळात सामान्य नागरिक रेल्वेतून प्रवाश करू शकत नाही तिथे मोबाईल चोरटे बिनदास्तपणे रेल्वे स्थानकात फिरत महिलांना टार्गेट करत असल्याचे सिद्ध झाले आहे.३० मी रोजी डोंबिवलीतील विद्या पाटीलयांचा मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वेतून पडून मृत्यू झाला. हि घटन ताजी असताना ) ४ जून रोजी अंधेरीमधील मॉडेल अभिनेत्री अंजीता अधिकारी (२०) हि पटना एक्स्प्रेसने मुंबईकडे परतत असताना सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी एक्स्प्रेसने आंबिवली स्थानक सोडल्यानंतर कल्याण स्टेशन जवळ असल्याने गाडीचा वेग कमी झाला होता. या दरम्यान अंजीता आपल्या आय फोनवरून कोणाशी तरी बोलत बोगीच्या दरवाजाजवळ उभी होती. इतक्यात रेल्वे ट्रक वर उभ्या असलेल्या साधारण २० ते २१ वर्षे वयाच्या चोरट्याने तिच्या हातावर जोरदार फटका मारला. यामुळे बेसावध असलेल्या अंजीता हिच्या हातातील मोबाईल खाली पडला. मात्र अंजली यांनी दरवाजाचे हंड्ल घट्ट पकडल्याने त्यांचा जीव वाचला. तर चोरटा मोबाईल घेऊन पळून गेला.या दोन्ही घटना रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे तर आहेत.तर या घटनेनंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे डोळे उघडले कि नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरीक विचारीत आहेत.


  रेल्वे पोलिसांनी शोधलेल्या फटका पोईटवरच हा प्रकार घडलेला असल्याने रेल्वे पोलीसाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.कोरोनाच्या आधी रेल्वेतील गर्दीचा फायदा घेणारे चोरते इतके बिनदास्त झाले आहेत कि त्यांना पोलिसांचे भयचराहिले नाही.कोरोना काळात महिलांच्या डब्यात महिलांची सुरक्षा महत्वाची आहे माहित असूनही गर्दी कमी असल्याचा फायदा मोबाईल चोरटे आणि फटका गॅँग घेऊ शकते हे सर्व सामान्यांना माहित असून रेल्वे पोलिसांनी याकडे  का  गांभीर्याने लक्ष दिले नाही. तसे काम करण्याची मानसिकता रेल्वे पोलिसांची नाही का रेल्वे पोलिसांवर वरिष्ठांचा वचक नाही. आपल्या रेल्वे स्थानकाच्या हद्दीत मोबाईल चोरते आणि फटका गॅँग सक्रीय आहे हे रेल्वे पोलिसांना माहित असते. मात्र पोलिसांचे लक्ष नसल्याचे माहित असल्याने चोरते प्रवाश्यांना हमखास टार्गेट करतात. कल्याणच्या पुढील रेल्वे स्थानका दरम्यान विरळ लोकवस्ती असल्याने चोरटे  लोकल, मेल एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर फटका मारून त्यांच्या हातातील मोबाईल चोरले जातात. रेल्वे पोलिसांनी कल्याण ते कसारा, कर्जत दरम्यान २०१९ मध्ये चोरट्याचा वावर असलेली ८ ठिकाणे निवडून त्या ठिकाणांना `फटका पाॅईट` घोषित करत या ठिकाणी रेल्वे पोलीस आणि इतर सुरक्षा रक्षक पथकाची २४ तासाची गस्त सुरु केली होती. या परिसरात दिसणाऱ्या संशयिताला ताब्यात घेत प्रवाशाचे या चोरट्यापासून रक्षण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता मात्र तरीही चोरटे पोलिसाच्या हातावर तुरी देत प्रवाशाच्या जीवाशी खेळ करत सुरु आहे.


   विद्या पाटील सारखे असे किती जणांचा जीव गेल्यावर रेल्वे पोलीस आपली डोळ्यावरची पट्टी काढणार आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाला याचे उत्तर नागरिकांना द्यावे लागेल. घटना घडल्यावर मोबाईल चोरट्यांना पकडण्याचा काय अर्थ राहतो. अश्या घटन घडूच नये म्हणून रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने काय `ल्पॅन`केला आहे ? महिलांच्या डब्यात सुरक्षा रक्षक नेमले आहेत का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणे रेल्वे पोलिसांना विचारली जात आहेत. `आमची सुरक्षा तुमच्या हाती, मग आमचा जीव का धोक्यात` ? अश्या प्रश्नांना रेल्वे पोलीस कसे  उत्तर देतील हे लवकरच समजेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या