युद्ध आणि महिलांचे प्रश्न
युद्ध हे कोणत्याही कारणासाठी झालेले असो , लढले गेलेले असो, अथवा युद्ध समस्या निराकरणासाठी उदभवले असो तरीही युद्धोत्तर काळाने मानवी समाजासाठी अनेकविध प्रकारच्या समस्यांना जन्म दिलेला आपण गतकाळातील अनेक उदाहरणांवरून समजू शकतो. भारतात मध्ययुगात तसेच प्राचीन काळात राजेशाही पद्धत अस्तित्वात होती तत्कालीन राजा आपल्या राज्याच्या सीमा विस्तारासाठी, स्वपराक्रम सिद्ध करणे हेतू अथवा एखादा राजा विशिष्ट स्री लालसेपोटी युद्धजन्य वातावरण निर्माण करून घेत असत व एकदा का युद्ध सदृश्य परिस्थिती उदभवली की मग त्यात शस्त्र संघर्ष उफाळून शौर्य सोबतच क्रूरतेचे देखील प्रदर्शन आपोआप केले जात होते.
जगात गतकाळात झालेल्या बहुतेक युद्धांनी मानवी समूहात संकटेच आणले आहेत. त्यातल्या त्यात अगोदरच साधारण वातावरणात महिलांचे प्रश्न हे सागरावाणी असतात. युधोत्तर काळात तर महिलांचे प्रश्न अनेक महासागरांचे रूप धारण करून समस्यांचा पर्वत नवे महापर्वत उभा राहत असतो . महिला ही उपभोगाची वस्तू आहे अशी काही मानवत शरीरांतर्गत विकृती असल्याने अवर्णनीय अत्याचारांची नोंद झालेली नसावीत यात शंका नसावी. खासकरून युद्ध ज्या भूमीत लढले जात असते त्या भूमीतील युद्धकाळातील महिलांचे प्रश्न भयंकर असावेत खासकरून संदर्भित भूमीतील पराभूत मानवी समुदायाच्या महिलांचे प्रश्न हे अवर्णनीय व अतिभयंकरच असावीत यात तिळमात्र शंका नाही, त्याला
कारण म्हणजे महिला ही भोगवस्तु आहे अशी मानवी विकृती.
युद्धातील बहुतेक जय व्यक्ती हा पराजय व्यक्तीची चल, अचल ,संपत्तीसह महिलांवर आपला हक्क प्रस्थापित करत असतो. भूतकाळात याच हक्क प्रस्थापित मनोवी कृतीमुळे भारतातील काही भागात महिलांनी जसे राजस्थानात सामूहिक आत्मदहन केल्याच्या नोंदी आहेत. आत्मदहनात स्री फक्त एखाद्या पुरुषाची पत्नीच नव्हती तर ती कुणाची आई ,बहिण ,मुलगी, कदाचित आजी देखील अशा विविध रूपातील रक्तातील नात्यातील होती. आपले राजेच व आपल्या सर्व सखी सोबती सुद्धा आता हे जग सोडून निघायच्या तयारीत आहेत अशा सदर राज्यातील ज्यांचा युद्धाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काहीही संबंध नसताना देखील सर्वसामान्य स्रीयांनी या सामूहिक आत्मदहनात स्वतःला झोकून दिले ही युद्ध काळातील स्त्रियांची केवढी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल .
राजस्थान राज्य हे अगोदर राजपुताना या नावाने अस्तित्वात होते तेथील राजा रतनसिंग हे युद्धात पराभूत झाल्याने तत्कालीन राणी पद्मावती सहित राज्यातील जवळपास तेरा हजार स्रीयांनी सामुहिक आत्मदहन 1303 मध्ये केल्याचे सर्वश्रुत आहे . हे उजेडात आलेल्या आत्मदहनापैकी एक आहे काही लहान-मोठे तर अंधारात लुप्त झाले.
आत्मदहन सोबत अनेक घरे उद्ध्वस्त झाले . आत्मदहनात अनेक स्त्रिया गरोदरपणा सहित स्वतःच्या जीवनाला पूर्णविराम देताना येणाऱ्या पिढीला हे जग पाहण्या अगोदर आपल्या सोबत घेऊन गेल्या. युद्धोत्तर काळातील असहनीय वेदना सहन करण्यापेक्षा, स्व मानहानी सहन करण्यापेक्षा, स्वलज्जा सांभाळण्यासाठी जीवन संपवणे केव्हाही योग्य या धीरोदात्त महिला स्वभावामुळे गत युद्धात अनेक कर्तबगार ,हुशार ,चाणाक्ष ,
माहितीप्रवण, नेतृत्वगुण असलेल्या महिलांनी आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला आहे .
महाराष्ट्र या राज्याचा विचार केला असता महाराष्ट्रात देखील अनेक लहान मोठे युद्ध लढले गेले खासकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील संघर्ष व त्या काळातील महिलांच्या प्रश्नावर टाकण्यात आलेला प्रकाश झोत हा वेगळेपण देणारा आहे. राजमाता जिजाबाई चे उत्तम व संस्कारक्षम देखरेखीखाली शिवाजी महाराजांचे बालपण फुलत गेल्याने महाराजांसोबत स्त्रियांविषयी आदराची दृष्टी होती . स्वतः राजमाता यांना युद्धकालीन परिस्थितीत स्री यांचे विविधांगी प्रश्न दिवस उजाडताच कसे धारदार भाल्याप्रमाणे आयुष्यात टोचणी द्यायला लागतात याची जाण होती. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हेदेखील युद्धावर असताना युद्धकाळात पतीच्या विरहात आयुष्य काय असतं हे स्वनुभवातून त्यांनी भोगले होते.
राजमाता जिजाबाई या आपल्या मुलाच्या अर्थात शिवाजी महाराजांना युद्धकाळात एक कडक व निर्वाणीचा संदेश देत असत .त्यांच्या एकंदरीत आकलनानुसार पदप्राप्त , सत्ताप्राप्त, अधिकार प्राप्त लोकांकडूनच युद्ध काळात स्त्रियांवर अत्याचार केले जातात यावर राजमाता जिजाबाई ठाम होत्या. त्यांच्या संदेशा नुसार आपल्या राज्यात दोन तीन किल्ल्यांची संख्या कमी राहिली तरी चालेल , राज्याच्या विस्तारात वाढ नाही झाली तरी संकोच नको परंतु स्त्रियांच्या आयुष्याची राखरांगोळी करुन, मायलेकींची ताटातूट करून राज्य उभे करता कामा नये. राजमाता जिजाबाई या ठिकाणी एक स्री समुदायाचे प्रतिनिधित्व करून हा संदेश देत असावेत ही बाब अधोरेखित करायला हरकत नसावी.
भारतातील काही रिती ,परंपरा या महिलांवर कठोर निर्बंध आणणाऱ्या असल्याने तसेच लिंगभेद अस्तित्वात असल्याने युद्धोत्तर काळातील स्त्री जीवन म्हणजे महाभयंकर शिक्षा होत .विशिष्ट चालीरीतीमुळे जसे भारतात काही काळ विधवा स्त्रियांवर खुप कठोर निर्बंध अस्तित्वात होते . उदाहरणादाखल जसे की विधवा पुनर्विवाह बंदी होती .पुनर्विवाह बंदी असल्याने अशा स्त्रियांचे शरीर मनोविकृती लोकांकडून चैनीची वस्तू बनून गेल्या खेरीज राहत नसेल. अकाली व अचानक जीवनातून पतीचे सोडून जाण्याने झालेल्या विधवा स्त्रीचे दुःख हे जगातील सर्वात भयंकर दु:खा पैकी एक होते. म्हणून युद्धकाळात रणांगणावर एका सैनिकाचा देह कोसळत असताना घरी बहुतेक विधवा स्त्री आपल्या जीवनाला पूर्णविराम देत असत. पुढील सारे आयुष्य विधवा बंधनात जगण्यापेक्षा संपवून घेणे त्यांना सोयीस्कर वाटत असावे. युद्धकाळात कर्ता व्यक्ती युद्धभूमीत असल्याने आपोआप घरातील सर्वोपरी जबाबदाऱ्या महिलांना उचलाव्या लागत असे. युद्ध काळात ज्या महिला गर्भवती असत त्यांच्या पोटी जन्म घेणारे काही निष्पाप बालक त्यांच्या काहीएक दोष नसताना आपल्या वडिलांचा चेहरा भविष्यात कधीच पाहु शकत नव्हते. बहुतेक युद्ध दीर्घकालीन चालत असल्याने सैनिक एकदाका रणभूमीत गेले की मोजकेच घरी परत येत असत.
हेमकांत मोरे .
10 अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार.
मोबाईल नंबर.
94 23 91 70 74
94 04 49 24 03.
0 टिप्पण्या