सहकार आयुक्त यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांकडून केराची टोपली...
कोरोना च्या पार्श्वभूमीवर लेखापरीक्षक नामतालिकेसाठी अर्ज न मागविता पुढील तीन वर्षे मुदतवाढ देण्याची लेखापरीक्षकांची मागणी...
*****************************************************************************
मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील बँका वगळता राज्यभरात 16000 पतसंस्था कार्यरत असून कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांची आर्थिक व्यवहार सुरू ठेवणाऱ्या सहकारी पत संस्थेचे लेखापरीक्षण करणाऱ्या सहकार विभागाने नियुक्त केलेल्या प्रमाणित लेखापरीक्षक व सनदी लेखापरीक्षक यांना ओळखपत्र देण्यासाठी सहकार आयुक्तांनी जावक क्रमांक /स.आ /२०/लेप /०६/ नाम तालिका/प्रलेप ओळखपत्र/१०५०/ 2020 दिनांक 28 /9 /2020 रोजीच्या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 आदी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आठ महिने उलटून देखील जबाबदार अधिकारी वर्गाकडून सहकार आयुक्तांनी लेखापरीक्षकांच्या ओळखपत्र देण्याच्या काढलेल्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवली असून त्यांचा तीन वर्षाचा कालावधी 31 मार्च 2021 रोजी संपला तरी कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नवीन नामतालिके साठी अर्ज न मागता पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच मार्च 2021 ते मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येऊन कायम करण्यात यावे अशी मागणी लेखापरीक्षकानी केले आहे .
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81नुसार सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण सहकार आयुक्त व निबंधक यांनी तयार केलेल्या व राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामतालिके वरील लेखापरीक्षककाकडून लेखापरीक्षण करून घेण्याची तरतूद आहे. सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकांच्या नामतालिके संदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(ब) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे नियम 69 (१)(फ) मधील तरतुदी नुसार सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकासाठी सन 2017 ते 2020 या कालावधीसाठी लेखापरीक्षक नाम तालिका तयार करण्यात आली असली तरी त्यांना ओळखपत्र त्यांचा कालावधी संपला तरी सुद्धा अद्याप देण्यात आलेले नाही . म्हणून त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी लेखापरीक्षकानी दैनिक वृत्तमानस मध्ये दि. 9 /3/ 2019 रोजी लेखापरीक्षक प्रशिक्षण व ओळख पत्र देण्यासंबंधी बातमी प्रसिद्ध केली होती. त्याचा आधार घेऊन प्रमाणित लेखापरीक्षक वेल्फेअर असोसिएशन मुंबई .कोल्हापूर ऑडिटर असोसिएशन .महाराष्ट्र सहकारी संस्था सर्टिफाईड ऑडिटर पुणे यांनी सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती.
प्रमाणित लेखा परीक्षक यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने त्यांना सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण वेळी तसेच कोरोणाच्या काळात रेल्वे प्रवास करताना व सभासदांना ओळख पटवून देण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याची बाब लक्षात आणून दिल्यानंतर सहकार आयुक्तांनी सर्व सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांना परिपत्रक याद्वारे प्रमाणित लेखा परीक्षकांना कालावधी संपायच्या अगोदर ओळखपत्र देण्याच्या सूचना अटी व शर्ती घालून कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रभावामुळे अस्तित्वात असलेल्या सन 2017 ते 2020 या कालावधीच्या सर्व लेखापरीक्षकाना दिनांक 31/3/ 2021 च्या अगोदर ओळख पत्र देण्यात यावे. असे जाहीर केल्यानंतर काही ऑडिटर संघटनेनी ओळखपत्र देण्यासाठी संघटनेचे सभासद करून घेऊन त्यांची सभासद वर्गणी भरून घेऊन ओळखपत्र देण्यासाठी फोटो सह फॉर्म भरून घेण्यात आले . अद्याप या लेखापरीक्षकाना ओळख पत्र मिळाले नसल्याने लेखापरीक्षकाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तरी संबंधित अधिकारी वर्गाने त्वरित दखल घेऊन सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकांना लवकरात लवकर ओळख पत्र देण्यात यावे. तसेच त्यांचा कालावधी कोरोना च्या पार्श्वभूमी लक्षात घेऊन सन 2021 ते 2024 पर्यंत वाढविण्यात यावा तसा शासन निर्णय किंवा आदेश काढून लेखापरीक्षका ना दिलासा देण्यात यावा .याची सर्व जिल्हा उपनिबंधक व अधिकारी वर्गानी दखल घेऊन सहकार आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाकडे लक्ष देऊन लेखापरीक्षकाचे प्रश्न त्वरित सोडवण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या