डोंबिवली ( शंकर जाधव ) नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी गुरुवारी करत २७ सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीसह भाजपा, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस.मनसे यांनी भव्य मानवी साखळीचे केले होते. मानपाडेश्वर मंदिरापासून ते पिसवली गावापर्यंत मानवी साखळी करताना यात वारकरी मंडळींनी टाळमृदुंग वाजवून आपल्या मागण्या सरकारपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप नेते तथा माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील, संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, गंगाराम शेलार, संतोष केणे, अर्जुनबुवा चौधरी,भास्कर पाटील, गजानन मांगरूळकर, नंदू म्हात्रे, दत्तात्रय वझे, लक्ष्मण पाटील, रंगनाथ ठाकूर, वसंत पाटील माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे,पप्पू म्हात्रे,राजन आभाळे संदीप पुराणिक,मुकुंद( विशू ) पेडणेकर,मंदार टावरे,मोरेश्वर भोईर, संदीप माळी, माजी नगरसेविका रविना माळी, अमर माळी, मनीषा राणे, लाल बावटा रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष काळू कोमास्कर,राष्ट्रवादीचे डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी, भालचंद्र पाटील, मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील. मनोज घरत, योगेश पाटील, विकी चौधरी, संदीप ( रमा ) म्हात्रे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
पिसवली कमानी ते पांडुरंगवाडी ( पिसवली )आडीवली,गोळीवली विको नाका,व्यंकटेश पेट्रोलपंप,दावडी, शंकरांनगर ते ललित नाका, सोनारपाडा, सागाव, नांदिवली पाडा,भोपर,वसंत वझे घर ते मानपाडेश्वर मंदिर समोर, रुनवाल गेट ते प्रीमियर कॉलिनी ( उसरघर ),घारीवली, कोळे गाव वळण ते वैभव नगरी ( हेदुटणे), निळजेपाडा घेसर, काटई,टोल नाका ते लोढा देसाई खाडी पूल निळजे या ठिकाणी केलेल्या मानवी साखळीत हजारो लोक सहभागी झाले होते.यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे म्हणाले,नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी आयोजित केली होती.आमच्या सर्वच्या मागणीकडे या सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी आमचे म्हणणे आहे.तर आमदार प्रमोद ( राजू ) पाटील म्हणाले, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव दिलेच पाहिजे.सरकारला सर्व जनतेच्या मागणीकडे का लक्ष देत नाही असा आम्हाला प्रश्न पडला आहे.तरीही आम्ही सर्वजण लोकशाही मार्गाने संयमाने मानवी साखळी केली आहे. कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणे म्हणाले, या मानवी साखळीत अनेक समाजाचे लोक सहभागी झाले आहेत.दरम्यान यावेळी पोलिसांनी ठिकठीकाणी बंदोबस्त ठेवला होता. तर वाहतूक पोलीस अधिकारी राजश्री शिंदे आणि कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते.
0 टिप्पण्या