राहुरी अर्बन तर्फे आमदार निलेशजी लंके व डॉ विश्वरूपरॉय चौधरी यांचा सन्मान




भाळवणी - दि. १० जून २१ 

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार निलेशजी लंके साहेब यांनी कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या ११०० बेडचे मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर मध्ये आज पावेतो तीस हजार रुग्णांना मोफत सेवा देऊन कोरोना मुक्त केले बद्दल आमदार निलेश लंके यांचा तसेच या कोविड सेंटर मध्ये फक्त जेवणातील खाद्यपदार्थ नियंत्रण करून रुग्णांना विना औषधं  कोविड मुक्त करण्यासाठी जगभर  नाईस मोहीम चालविणारे व नैसर्गिक उपचार पद्धती मधील जग प्रसिद्ध तज्ञ तथा इंडो व्हिएतनाम मेडिकल बोर्डचे डायरेक्टर डॉ विश्वरूप रॉय चौधरी   यांचा राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन पतसंस्थे तर्फे वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.

      या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, योग प्रशिक्षक किशोरजी थोरात, बाळासाहेब खिलारी, अविनाश साबरे, प्रमोद गोडसे, राजेंद्र चौधरी आदींसह हजारो कोरोना मुक्त रुग्ण व नागरिक  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या