डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या २२ वा वर्धापन दिनानिमित्त कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील यांच्या आदेशाने कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे साहेब यांच्या सहकार्याने जिल्हा सचिव ॲड ब्रम्हा दिनेश माळी यांच्या प्रयत्नातून कल्याण ग्रामीण मधील वार्ड क्र. ११४ भोपर गजानन चौक विभागामध्ये मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप सोशल डिस्टशिंग व कोरोनाचे सर्व नियम पालुन करण्यात आले. यावेळी वार्ड अध्यक्ष योगेश डांगे, निखील शहा, अभय भुवड, अजिंक्य माळी, अक्षय वंजारे, मनिष कोळी, सुरज शिर्के, छोटेलाल विश्वकर्मा आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या