चेंबूरमधील कोरोना लसीकरण केंद्राला आदित्य ठाकरे यांची "सरप्राईज ' भेट

आदित्य ठाकरे यांची "सरप्राईज ' भेट 



        मुंबई - चेंबूरमधील सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल येथे चेंबूर सिटीझन्स वेल्फेअर या अग्रगण्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राला युवा सेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण ,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी "सरप्राईज ' देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

        पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल दुपारी  साडे बारा वाजण्याच्या सुमारास चेंबूरमध्ये प्रवेश करत चेंबूर सिटीझन्स वेल्फेयर असोसिएशनच्या प्रमुख आणि माजी नगरसेविका सुप्रदा फातर्फेकर यांना अचानक फोन करून सांगितले की मी  चेंबूरमध्ये आलोय आणि तुमच्याकडे येतोय.सुप्रदा यांनी मोबाइलवर थेट मंत्री आदित्य ठाकरे हे बोलत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला .त्यांना क्षणभर काय बोलावे सुचेनासे झाले. त्यानंतर काही मिनिटातच आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर दाखल झाले . 

        यावेळी शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्फेकर आणि सुप्रदा फातर्फेकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरण केंद्रावरील प्रत्यक्ष कामकाज पाहून समाधान व्यक्त करत सुप्रदा फातर्फेकर आणि चेंबूर सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या आजवरच्या कामाचे दाखले देत त्यांचे कौतुक केले.या "सरप्राईज ' भेटीवेळी असोसिएशनचे पदाधिकारी, सेंट अँथनी गर्ल्स हायस्कुलचे प्रमुख पदाधिकारी ,शिक्षक आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या