काव्यधारांनी रंगले पर्यावरण कवीसंमेलन
साहित्य जागर मंच व बहिणाबाई साहित्य संस्था आयोजित ऑनलाईन पर्यावरण कवी संमेलन दिनांक 6 जून रविवार रोजी उत्साहात पार पडले.शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रदीप कासुर्डे सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन छानपैकी केले. लिलाधर महाजन सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.संमेलनाची सुरुवात ही निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांची अरे खोप्यामधी खोपा कविता धनश्री महाजन हिने सादर करून केली. महाराष्ट्रातील विविध भागातील कवीनी आपल्या सुंदर सुंदर रचना सादर केल्या. यात पर्यावरण रक्षण, शेतकरी बाप,कष्टकरी बाप, पाऊस, सुंदर निसर्ग, प्रदूषण, खाणदेश, काळी माती, हिरवा निसर्ग, इत्यादी विविध विषयावर रचना सादर करण्यात आल्या. या संमेलनात 25 कवींनी आपल्या सुंदर सुंदर कविता सादर केल्या. संमेलनात अपर्णा बोकील, अनुराधा आटोळे, भारती चौधरी,लता पाटील, मनीषा चव्हाण वेदिका पाठारकर, प्रज्ञा अंधुरे, अक्षता नाईक, ख़ुशी साह, प्राची सोनावणे, धनश्री महाजन ज्ञानेश्वरी आटोळे, सौरभ आहेर, गणेश निकम, संतोष सावंत, अजय सोंडूलकर, विनोद बांदोडकर,निर्भय साह,इत्यादी कवी उपस्थित हॊते.
या संमेलनाचे विशेष म्हणजे प्रदीप कासुर्डे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पर्यवरणाला महत्व देणारे तत्कालीन पत्र वाचून दाखवले व महाराजांचा पर्यावरण दृष्टीकोन समजावून सांगितला. अशाप्रकारे काव्यधारांनी रंगलेल्या संमेलनाचा शेवट पुढील संमेलनाची मनात आस घेऊन आभार प्रदर्शनाने झाला.
0 टिप्पण्या