राज्यात आतापर्यंत ३ कोटी लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस


राज्यात आतापर्यंत ३ कोटी लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस


मुंबई - महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना लसीचे ३ कोटी लोकांना डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्राने कोरोना लसीकरणामध्ये आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात आज दुपार २ वाजता ३ कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. दुसरीकडे महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्बंध वाढवण्यात आले आहेत.


महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यापाठपाठ करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे देखील राज्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांमध्ये डेल्टा प्लसको कोरोना विषाणू आढळून आल्यामुळे आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महापालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या