राजकिय ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलनामध्ये आता राष्ट्रवादी
दादरमध्ये घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने
मुंबई -अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राजकीय ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलनाला राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फे आज जाहीर पाठिंबा देत दादर येथील प्लाझा सिनेमासमोर घोषणाबाजी जोरदार निदर्शने केली.
या पाठींबा आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे,महाराष्ट्र उपाध्यक्ष बापुसाहेब भुजबळ,जिल्हा अध्यक्ष रमेश परब , जिल्हा सचिव हरेश धिवर ,भालचंद्र पाटील,वार्ड अध्यक्ष महादेव शिंदे,दिपक पाटील, भालचंद्र दळवी, महिला तालुका अध्यक्ष अंजु मोरे, मेदारे आई,नंदा राठोड, गुडेकर ताई ,तालुका कमिटी दिपक बागुल,संजय प्रजापती, सुरेश शिगवन, जगदिश दहिया,चेंबूर तालुका अध्यक्ष दिपक सावंत व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी यातील काहीजणांना ताब्यात घेऊन नंतर जामिनावर सोडले.


0 टिप्पण्या