पालघर पोलीस दलाकडून ‘ऑपरेशन ऑल आउट’..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
९५ वाहनधारकांवर गुन्हे दाखल व ७५ निगराणी बदमाशांची एकाच वेळी तपासणी..
पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व सर्वसामान्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी पालघर पोलीस दलाकडून अपर पोलीस अधीक्षकांसह ४३ पोलीस अधिकारी व २३३ पोलीस अमलदारांनी रात्रभर ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अभियान राबविले.
या अभियानात १६ पोलीस ठाणे हद्दीमध्ये ३८ महत्त्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावण्यात आली होती. तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या एकूण ३३ वस्त्यांमध्ये एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये ९५ वाहनधारकांवर गुन्हे दाखल व ७५ निगराणी बदमाशांची एकाच वेळी तपासणी करण्यात आली.
सदरचे अभियान १) नाकाबंदी २) ऍक्शन टीम/हंटर टीम – कारवाई पथक
३) कोम्बिंग ऑपरेशन – गुन्हेगार लपण्याच्या वस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने मनुष्यबळाने जाऊन संपूर्ण क्षेत्र पिंजून काढणे व गुन्हेगारांचा शोध घेणे. अशा महत्त्वाच्या तीन टप्प्यामध्ये पार पाडण्यात आले.


0 टिप्पण्या