राग कसा हाताळावा?
नमस्कार मित्र/मैत्रीणिनों,
आज मी तुमच्या समोर एक महत्वाच्या विषय मांडणार आहे, अन तो म्हणजे 'राग' आणि 'आयुष्य', मित्रानों तस पाहायला गेल तर आपलं या जगात कोणीच हक्काच नसत, पण अस असून सुद्धा आपण सर्वांवरती कधी न कधी हक्क गाजवतो, त्यात जवळचे नातलग मित्र मैत्रीणी सर्व जण आलेत, खर तर आपण जगात जन्माला ऐकटेच येतो, अन शेवटही तसाच एकटयाचाच होतो, फक्त फरक इतका असतो की येताना आपण विना अनुभवा ने येतो, परंतू जाताना आपल्यासोबत हजारों क्षणांच्या अनुभवाच गाठोड़ असतं जे कधी कळत कधी नकळत जमा केलेलं असतं, काही त्याला कर्माचं गाठोड़ संबोधतात. विषय थोडा़ खोल आहे म्हणून आयुष्यावर आधी मांडतोय, पुढे काय लिहून ठेवलय हे ना तुम्हाला ठाऊक असत न आणखी कोणाला, पण सामोरं मात्र सगळयांनाच जाव लागतं, त्यात काही जण तीव्र भावनांचा वापर करतात तर काही सौम्य, आता या सगळयामध्ये सगळयात वेदनादायी काही शस्त्र जर काही असेल तर तो राग, अस म्हणतात राग माणसाचा शत्रु आहे, आता कित्येकांना ते पटतय मला माहीत नाही पण माझ्या अनुभवानुसार राग हा परीचारक आहे तुमच्या आत दडलेल्या सुप्त भावनांचा ज्या तुम्ही समोरच्या व्यक्ती बद्दल मनात ग्रृहीत धरल्या आहेत वा असाव्यात, म्हणूनच किंबहूना आपली आवडती व्यक्ती थोडी वेगळेपणाने मत मांडू लागली की बहुतांश सर्वांनाच त्वरीत राग येतो, मग आपणही प्रत्तूतर देतो अन पर्यायाने तो राग "वाद-विवादा" मधे जातो. मग यावर कराव काय? या प्रश्नाच उत्तर तस काहीस लोकाना पटत नाही पण तेच त्याच योग्य उत्तर असावं कारण त्याचे परीणाम आपल्यावर अवलंबून असतात उदा.: तुम्ही लगबघीने कामाला जात असता, तुम्हाला तुमच ध्येय अर्थात जाॅब पर्यंत पोहोचायच असत तितक्या तुमची गाडी सुटते तुम्ही धावता घाई करता अन गाडी जवळपास पकडताही कारण त्या वेळेस तुमचं उदिष्ठ पुर्ण झालेलं असतं तुम्ही लक्ष देणारच की तुमचा तोल जातो तुम्ही खाली पड़ता, तुम्हाला थोडफार लागतहीं/कधी कोणाला जास्तही लागतं, काहींच्या जखमांचे घाव आयुष्यभर राहतातं हो की नाही? नक्कीच हो असेल उत्तर आता यावर थोडा विचार करा, घटना साधी आहे परंतू त्याचा परिणाम भयंकर झाला
1) तुम्ही पडलात आता जाॅब ला जाऊ नाही शकलात,
2) तुम्हाला लागलही
3) घाव ठीक व्हायला काहीसा वेळ ही लागेलचं।
म्हणजेच तुमच जे ध्येय होतं पुढे जाण्याच ते या कारणानं काहीस थांबलं काहींना एक दिवसाचा पगारावरही पाणी सोडाव लागतं अन खर्च वेगळाच, आता विचार करा जर थोडासा आलेल्या त्या क्षणाला तुम्ही विचारपुर्वक जर हाताळं असत तर हे झालं असत कां,? नक्कीच नाही झाल असतं तुम्ही विचार करुन दुसरा पर्याय शोधला असता थोडा़ उशिर झाला असता पण तुमचं ध्येय पूर्ण झालं असतं.
तसेच जर राग ही आपली कमजोरी असली तर त्यावर थोडा़ वेळ देवुन प्रत्तूत्तर करणं हे किंबहुना नेहमीच फायद्याचं. त्याने विषयातर होत नाही परिस्थिती नियंत्रणात राहते अन आपल मन स्थिर हेच तर हवय
राग आपल्याला लोकांमुळे नाही तर त्यांच्या कडून आपण ठेवलेल्या अत्युच्च अपेक्षा मुळे येतो, म्हणुनच, रागावर ताबा राखयचा एकच राजमार्ग तो म्हणजे कमी अपेक्षा, अन प्रसंगावधान राखून विचार करुन बोलनं,थोडा वेळ घेण केव्हाही उत्तम असतं सगळे जण आपल्या प्रमाणे वागणार नाहीत पण थोड़फार सामंजस्य आपलं आपणच दाखवावं
माघार न घेता स्वाभिमानाला रुचेलं तेच अन तस जाणीवपणे करणे यालाचं वागणं म्हणतातं.
0 टिप्पण्या