काय म्हणावं ? आश्चर्य, नवल कि चमत्कार ! एकाच वेळी दहा मुलांना जन्म !

 गिनीज बुक ऑफ रेकोर्ड . एकाच वेळी दहा मुलांना जन्म !



South African Gauteng Woman Gives Birth 10 Babies:
दक्षिण आफ्रिकेत एका महिलेने तब्बल १० बाळांना जन्म दिला आहे. हा एक जागतिक विक्रम असल्याची चर्चा आहे. याआधी मागील महिन्यातच मालीमधील महिलेने ९ बाळांना जन्म दिला होता.

          दक्षिण आफ्रिकेत एका महिलेने १० मुलांना जन्म दिला आहे. डॉक्टरांनी अधिकृतपणे याला दुजोरा दिल्यास हा एक विक्रम असणार आहे. एक महिन्यापूर्वीच माली देशातील महिलेने मोरक्कोमध्ये ९ मुलांना जन्म दिला होता. दक्षिण आफ्रिकेतील महिला गोसिअमे थमारा सितोले (वय ३७) या महिलेने १० मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे.

         सितोलेचे पती टेबोगो त्सोत्सीने सांगितले की, ७ जून रोजी प्रिटोरियन रुग्णालयात सिजेरियन शस्त्रक्रियेने प्रसुती झाली. डॉक्टरांनी गरोदरपणाच्यावेळी केलेल्या तपासणीत सहा मुले असल्याचे टेबोगो यांना सांगितले होते. त्यानंतर आठ मुले असल्याचे सांगितले. मात्र, प्रसुतीवेळी १० मुलांचा जन्म झाला. पहिला ९ मुलांना जन्म देण्याचा रेकॉर्ड आहे ! हा रेकार्ड आता मोडीत निघाला असून आता हा नवीन रेकार्ड रचला गेला आहे !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या