मुंबई डबेवाल्यांची पोरं देणार ३० मिनिटात १५ हजार कुटुंबांना मोफत कांदे वाटप

 मुंबई डबेवाल्यांची पोरं देणार ३० मिनिटात १५ हजार कुटुंबांना मोफत कांदे वाटप



मुंबई - मागील बारा वर्षे अखंडपणे महाराष्ट्रातील अनेक गरजूंना मदत करण्याचे सेवाकार्य  हाती घेतलेल्या क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मंगेश पांगारे यांच्या नेतृत्वाखाली क्षितिजचे हजारो सैनिक येत्या रविवारी १३ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता दहिसर मागठाणे येथील गरजू कुटुंबीयांना एक अनोखी भेट देणार आहेत .


या विभागातील १५ हजार  कुटुंबीयांना क्षितिज ग्रुपच्या वतीने मोफत कांद्याचे वाटप करण्यात येणार आहे आणि तेही अवघ्या तीस मिनिटात! कोरोनाचे  सर्व नियम पाळून हा एक नवा विक्रम करणार आहेत. एवढ्या कमी वेळात अशक्य असलेली ही गोष्ट शक्य  होण्यामागील कारण म्हणजे क्षितिजचे अध्यक्ष मंगेश पांगारे यांचे वडील एक मुंबईतील डबेवाले होते. त्यामुळे कमी वेळेत अचूक व्यवस्थापन कसे करावे त्याचे बाळकडू त्यांना भेटले आहे आणि यामधूनच हे वाटप शक्‍य होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या