प्रतिनिधी: अवधुत सावंत
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून १० टक्के आरक्षणाचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा लाभ सरळ सेवा भरतीवेळीही मराठा समाजातील उमेदवारांना होणार आहे. या निर्णयमुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राज्यात मराठा समाजातून तीव्र प्रतिकिया उमटत होत्या. तसेच विरोधी पक्ष आणि सत्ताधार्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत होत्या. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याप्रश्नी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व पक्षांमधील प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती. तसेच ६ जूनपर्यंत सरकारने याप्रश्नी ठोस निर्णय जाहीर करावा, असे आवाहन केले होते. अखेर राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गातून १० टक्के आरक्षणाचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतला.
मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना एसटीत नोकरी
आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षणाचा निर्णय मागील वर्षी केंद्र सरकारने घेतला होता. आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न व पाच एकरपेक्षा अधिक शेती नसणार्या कुटुंबातील विद्यार्थांना शिक्षण आणि नोकरीत या आरक्षणाचा लाभ मिळतो.
0 टिप्पण्या