प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली वाहतूक उपविभागात नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. बाजीराव तुळशीराम भामरे हे आज रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी आतापर्यंत पोलीस मुख्यालय, रामनगर, कोळशेवाडी, निजामपुरा, भिवंडी पोलीस ठाणे व डोंबिवली वाहतूक शाखा येथे उत्कृष्ठ सेवा बजावली आहे.
त्या निमित्ताने पोलीस निरीक्षक श्री उमेश गित्ते यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीररीत्या सत्कार केला. त्यांच्या ३४ वर्षे पोलीस खात्याच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल डोंबिवली वाहतूक विभागाच्या वतीने उपनिरीक्षक राजश्री शिंदे व त्यांचे सहकारी या सर्वानी कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना पुढील निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. श्री.भामरे हे काही दिवसांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह आले होते व उपचारानंतर आता नुकतेच रुजू झाले होते.
0 टिप्पण्या