करोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी डोंबिवलीत जंतुनाशक व धूर फवारणी
पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशा नुसार, कल्याण डोंबिवली शहरात विशेष मोहिम ६ आणि ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून, घनकचरा व्यवस्थापक- उपायुक्त रामदास कोकरे यांचे मार्गदर्शनानुसार विविध प्रभागात करोनाचे उच्चाटन करण्यासाठी पालिका अधिकारी - कर्मचा-यांंनी कंबर कसली आहे. डोंबिवली येथील `फ` आणि `ग` प्रभागात मोहीम राबविण्यात आली.यावेळी पालिकेचे मुख्य आरोग्य निरिक्षक नरेंद्र धोत्रे, वसंत देगलूरकर, शेकडो कर्मचारी ११ सिटी ट्रक्टर्स, ४जिप फाग मशीन, तसेच दहा प्रभागातील हँड फाग मशीन द्वारे जंतुनाशक फवारणी आणि धुरावणी करण्यात आली.
0 टिप्पण्या