महिला दिननिमीत्त - कविता .

 महिला दिननिमीत्त - कविता .

 नारी शक्ती');



कुटुंबाच्या सुखात 

सुख शोधणारी तू

अन मुला-बाळावर, 

नवर्यावर प्रेम करणारी नारी तू ||१||


घे तू उंच उंच भरारी, 

अन रोशन कर दुनिया सारी 

फिरुन पाहू नकोस माघारी,

तुझ्यात शक्ति आहे लय भारी ||२||


बलात्कारी नराधमांच्या,

नरडीचा घोट घेणारी तू,

यमसदनी पाठवीणारी

 कलियुगातील नव दुर्गा  तू ||३||


कर्तव्याची मशाल पेटव,

 अन जागव तुझ्यातील जिजाऊला 

अन्यायाविरुद्ग वाघिण बनून 

फोड तू  डरकाळीला ||४||


देवी पार्वती जर नसती तर ,

गणपती जन्मास आले असते का?

मग गर्भातल्या कन्ये मध्येही,

 पार्वतीचे रूप दिसले असते का?||५||  

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

चंद्रकांत हरिभाऊ खोसे (सर)

मोरेश्वर कॉमप्लेक्स , डी- ४०३, सेक्टर- १८ ,कामोठे , नवी मुंबई.

भ्रमणध्वनी क्रमांक- ८१०८४६९६३५

atOptions =

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या