एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात होणार नवीन पादचारी पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण

   एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात होणार नवीन पादचारी पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण

 


डोंबिवली( शंकर जाधव )  कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्रामचा पादचारी पुलाच्या कामाला गती आली आहे. सदर पूल हा पूल धोकादायक झाल्याने तो पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी काही कालावधीपासून बंद ठेवण्यात आला होता.कल्याण लोकग्राम पादचारी पूल कधी सेवेत येणार असा प्रश्न देखील प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात झालेली आहे. 

     या पूलाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत अनेक वेळेस बैठका घेऊन सदर पुलाचे काम युद्ध पातळीवर होण्यासाठी स्वतः जातीने लक्ष देत असल्याचे हि आपल्याला दिसते. तसेच सदर पुलासाठी लागणारे प्राकलन रक्कम ७८ कोटींची आवश्यकता होती परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हते.सदर पूलासाठी कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पांअंतर्गत निधीची उपलब्धता होणेस खासदार डॉ. शिंदे हे नेहमीच आग्रही होतेत्यासाठी स्वतःपाठपुरावा करून शासनाकडून केडीएमसीत निधी उपलब्ध करून देऊन रेल्वे प्रशासनाकडे वर्ग करण्याकरिता खासदार डॉ. शिंदे यांना यश प्राप्त झाले. रेल्वेने जुन्या लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकाम करण्याची निविदा प्रसिद्ध केली होतीत्यास अखेर सुरुवात झाली असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी माहिती दिली. ०५ मार्च रोजी लोकग्राम येथील पादचारी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली असून जून शेवटपर्यंत पाडकाम पूर्णत्वासव लगेचच नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवार होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सदर पुलाचे पाडकाम व नवीन पुलाचे काम हैदराबाद मधील कंपनीला मिळाले असून त्यांनी मुंबई मधील नावेद इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला  करार पद्धतीने काम करण्याचे सोपवले असल्याचे समजते.त्याचबरोबर पाडकाम संपण्याच्या आत पादचारी पूलाच्या बांधकामाची निविदा देखील रेल्वेकडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणारत्यामुळे पाडकाम संपताच नव्या पादचारी पुलाच्या बांधकामाची निविदाप्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण करून लगेच नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात कोणताही अडथला व विलंब होणार नाही असे देखील खा.डॉ.शिंदे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या