कल्याणपश्चिमेकडील डी मार्टमध्ये खरेदीसाठी उसळली गर्दी..
डोंबिवली ( शंकर जाधव) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतान नागरिकांनी खरेदीसाठी कल्याण पश्चिमेतील डी मार्टमध्ये गर्दी केल्याने सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. डी मार्टमध्ये ग्राहकांची गर्दीझाल्याची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी डी मार्ट व्यवस्थापनाच्या विरोधात कारवाई केली होती. पुन्हा दोन दिवसांनी सायंकाळी नागरीकांनी खरेदीसाठी डी मार्टमध्ये गर्दी केली होती. खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरीकांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो अशी सगळीकडे चर्चा आहे. लॉकडाऊन लागू झाल्यावर खरेदी कुठून करणार ? सोशल डिस्टसींगचा फज्जा उडाल्याने डी मार्टच्या विरोधात दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई केली जाणार आहे. या उपरही त्यानी नियमांचे पालन केले नाही तर डी मार्ट सील करण्याची कारवाईही केली जाऊ शकते अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
0 टिप्पण्या