गरोदर महिलांसाठी आहार-आरोग्य व मानसिक स्वास्थ्य मार्गदर्शन शिबीर संपन्न

 गरोदर महिलांसाठी आहार-आरोग्य व मानसिक स्वास्थ्य मार्गदर्शन शिबीर संपन्न

 

CC

 कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण पूर्व कोळसेवाडी विभागातील अंगणवाडी सेविकाआशा वर्कर यांच्या सहकार्याने गरोदर महिलांसाठी आहार-आरोग्य व मानसिक स्वास्थ्य विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्याला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

 

   टिळक महाराष्ट्र विद्यापीठखारघर येथील समाजकार्य विभाग एम.एस.डब्ल्यूच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी समाज कार्यकत्र्याना चौथ्या सत्रासाठी विषयाधारित क्षेत्र कार्यासाठी ‘‘कोरोना काळात शहरी भागातील गरोदर महिलांच्या आहार व आरोग्यावर झालेला परिणाम’’ हा विषय निवडला होता. या विषयाला अनुसरून गटकार्य करत असताना विद्यार्थी समाज कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी कल्याण पूर्व विभागातील गरोदर महिलांबाबत सर्वे केला. यासर्वेत महिलांना गरोदरपणातील समज-गैरसमजशारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य व आहार विषयक सखोल मार्गदर्शनाची गरज आहेअसे जाणवले. हा सर्वे मानसी जाधवप्रियंका निकमसाधना खाडेश्रीमंतराव आंबवडेकरण परदेशीदिपाली कणसेज्ञानेश्वर पालवीपप्पू देसलेप्रियंका गळवेअनिता जाखेरे या विद्यार्थी समाज कार्यकर्त्यांनी केला होता.या विद्यार्थी समाज कार्यकर्त्यांनी गुप एॅक्टिविटी म्हणून त्यांनी समाजकार्य विभागप्रमुख स्मिता वारघडे व तसेच क्षेत्रकार्य मार्गदर्शक कोमल देवकाते यांच्या मार्गदर्शनातून गरोदर महिलांसाठी आहार व आरोग्य विषयक मागदर्शन शिबीर घेण्यात आले. हे शिबीर नुकतेच विठ्ठल रूक्मिणी मंदीर या ठिकाणी घेण्यात आले. या शिबीरात कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. या शिबीरात डॉ. सुषमा बसवंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले या कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉ.बसवंत यांनी गरोदरपणात काय खावे काय खाऊ नयेकाय करावे काय करू नयेतसेच समज गैरसमजगरोदरपणामध्ये येणारे चंद्रग्रहणसूर्यग्रहण याबाबतच्या अंधश्रध्दा याविषयी वैज्ञानिक रित्या मार्गदर्शन केले. तसेच मुलगा-मुलगी भेद करू नये.मुलगा-मुलगी समान मानावे.गरोदरपणात कोणते व्यायाम करावेतकोणते करू नयेयोगासने तसेच आहार व मानसिक स्वास्थ्य जपण्याविषयी मार्गदर्शन केले. विजय भोसले म्हणालेगरोदर महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाची गरज आहे. हे कार्यक्रम नियमित झाले पाहिजे.सामाजिक जनजागृती झाली पाहिजे.महिलांनी सुध्दा आम्ही यापूर्वी कधी ही अशा पध्दतीचे गरोदर महिलांसाठीचे मार्गदर्शन शिबीर पाहिले नव्हते.या शिबीरातून आमच्या मनातील अनेक शंका व समज-गैरसमज दूर झाल्याचे सांगितलेआहारातील प्रोटीन्सचे महत्त्व जाणून उपस्थित गरोदर महिलांना प्रोटीन पावडरचे डब्बे वाटप करण्यात आले. या शिबीरासाठी अंगणवाडी सेविका प्रतिभा खोब्रागडेरुपाली पाटीलप्रतिभा साळवेललिता आखाडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रियंका निकम यांनी तर श्रीमंतराव आंबवडे यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या