डोंबिवली रामनगर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

  डोंबिवली रामनगर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन 


 

डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून डोंबिवली रामनगर पोलिसांनी नागरिकांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. गर्दी करू नका, आवश्यक असल्यास घराबाहेर पडा. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा.घराबाहेर निघताना तोंडावर मास्क लावा. सानाजिक अंतर ठेवा अश्या प्रकारच्या उद्घोषणा पोलीस करत आहे.फडके रोडनेहरु रोडबाजीप्रभू चौकइंदिरा चौक या ठिकाणी पोलीस सकाळपासून आवाहन करत आहेत.ठाणे  आयुक्तालय परिसरात  सीआरपीसी कलम १४४ () (प्रमाणे  जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून सदर मनाई आदेशाचा भंग केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या