अनेक देवस्थानांनी परिपूर्ण आणि निसर्गसंपन्न असे वैशिष्ट्यपूर्ण असलेले गाव म्हणजे नरडवे गाव
“अखंड हरिनाम जागरण सप्ताह’
नरडवे ब्राह्मणदेव मंदिरात हरिनाम सप्ताह
जत्रोत्सव 17 फेब्राुवारी ते 23 पर्यंत आहे.
नरडवे अंबादेवी मंदिरात सप्ताह 21 फेब्राुवारी ते 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत आहे.
(संतोष सावंत): सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यापासून जवळच असलेल्या नरडवे गावातील घोलाणवाडी येथे श्रीस्वयंभू अर्थात श्रीशंकराचे मंदिर आहे| हे श्रीब्रमणदेव या नावाने प्रसिध्द आहे. तसेच या गावात दक्षिणाभिमुख असलेली अंबादेवी‚ विठ्ठलादेवी दिर्बादेवी‚ रवळनाथ‚ महापुरूष‚ विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर इत्यादी अनेक मंदिरे आहेत. श्रीब्राह्मणदेव हे श्रीस्वयंभू जागॄत देवस्थान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रासिद्ध आहे.
नरडवे गाव सहयाद्रीच्या कुशीत वसलेले असून चहुबाजुंनी जंगलाने व्याप्त असलेल्या या गावात निसर्गराजाची कॄपा इथल्या जनमाणसावर आहे. गर्द वनराई आहे. त्यामुळे वरूणराजाची कॄपा आहे देवालयाच्या एका डाव्या बाजूने पाण्याचा लहानसा ओहोळ आहे. तेथे बाराही महिने पाणी असते. कधीही आटले जात नाही. तसेच देवालयाच्या पुर्वेकडून येणारी आणि देवालयाच्या बाजूच्या कठ्याला स्पर्श करुन उजव्या भागाकडे वळण घेऊन वाहणारी नदी म्हणजे हीच ती ‘गडनदी’ होय. हिचा खरा उगम हा ‘सोनगड’ येथूनच झालेला आहे. म्हणूनच कि काय या नदीला ‘गडनदी’ नावाने संबोधले जात असावे| व दुसरीकडे ‘भैरवगड’ आहे| यामुळेच ही वाडी ‘भेर्देवाडी’ या नावाने परिचित आहे| या भैरवगडावरुन वाहात येणाऱ्या ओहोळाला ‘भेरांबा’ हे नाव पडले. तो या गडनदीच्या उगमापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर मिळतो. येथेच आता ‘नरडवे महमदवाडी धरण प्रकल्प’ उभारण्याचे काम जोरात चालू आहे| येथे तिन्ही बाजूंनी सहयाद्रीच्या भव्य पर्वतरांगा असल्यामुळे येथे धरणप्रकल्प उभारण्याकरिता शासनाला सोयिस्कर झाले आहे
. या गांवाला ऐतिहासिक महत्व आहे. व तसे तेथे पुरावे अजूनही पाहाण्याजोगे आहेत| फार फार वर्षापुर्वी शिवाजी महाराज या दोन्ही गडावर येउन जाऊन असायचे व तेथील काही आमचे काही पुर्वज शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी त्या गडावर व त्या गडाच्या खाली बंदोबस्तासाठी टेहळणी करत बसायचे| याची सत्यता हल्लीच सात वर्षापूर्वी कळुन आली आहे. गडनदीच्या किनारी श्रीब्र ब्राह्मणदेवाच्या देवळापासून जवळच काही गांवकरी विहीर खोदत असताना तेथे तोफ आढLली| तसेच भैरवगड व सोनगडावरही अजूनही तेथे तोफा व शिवकालीन काही अवजारे अजूनही पाहायला मिळतात. हे ऐतिहासिक गांव सहयाद्रीच्या कुशीत वसलेले आहे|या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत|ख्रिश्चन समाज बांधव मोठया प्रमाणात आहेत|महमदवाडी येथे एक चर्च आहे.
पावसाळ्यात येण्याऱ्या पुराचं पाणी त्याचबरोबर खळखळाट करीत वाहून जाणारे दगड¹गोटे त्याचा होणारा कानठLया बसवणारा आवाज हे एखादया अतिथीचं पावसाLयात होणारं स्वागतच होय| येथे साग¹शिसवी सारख्या मौलवान वॄक्षांची पैदास होते| गावाचे संरक्षण करण्यासाठी चोहोबाजुंनी डोंगर तिरासारखे उभे आहेत| येथे पावसाच्या पाण्यावर होणारी शेतेच फक्त घेतली जाते| भातशेतीचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते| रब्बी पिकांमध्ये कुळीद‚ भुइमूग‚ मका‚ ज्वारी‚ }सही चांगल्याप्रकारे हो} शकतो पण काही महिने उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी पुवठा होत नसल्यामुळे तेथील शेतकरी पिक घेण्यासाठी इच्च्छुक असूनही पाण्याअभावी रब्बी पिकं घेतां येत नाहीत| ही एक मोठी खंत शेतक¹यांना अजूनही सतावते| पण या भागात आता धरण होत असल्यामुळे इतर आजूबाजूच्या खालच्या गांवांना या धरणाच्या पाण्याचा पुरेपूर शेतीसाठी वापर होईल यात शंकाच नाही|महमदवाडी घोलाणवाडी भेर्देवाडी सोनवडे गावातील दुर्गवाडी सांद्रेवडी अशी मिळुन नरडवे गावठणवाडीचा असा काही भाग हा पाण्याखाली जाणार असल्याने तेथील लोकांना शासनाने जवळच दिगवले गांव व कनेडी सांगवे या गावांत शासनाने प्रकल्पग्रस्तांना घरांसाठी जागा दे} केलेली आहे.
पावसाळ्यात सकाळच्या प्राहरी रानातून आडवळणी वाटेवरून जातांना अंगावर पडणारे‚ टपटप आवाज करणारे जलबिंदू अनोLख्या वाटेवर वाटसरूच्या पावलांंचे ठसे उमटल्यासारखे दिसतात. कोठेतरी दूरव कोकिLेच्या आवाज‚ माकडांचं काLविटाला पाहून चित्कारणं ते ऐकून खारूताईच आवाज करत इकडे¹ तिकडे फिरणं‚ खरंच किती चित्ताकर्षक वाटत? रानातल्या फुलांचे काहूर काय होतेे? शब्दाच्या गुंफणीतले ते पाखरू कोण होते ? शब्दही जिथे अपुरे पडतात अशा या नयनरम्य गावात माणूसपणाला जगणारं माणूस नावाचं एक सत्य आहे|नरडवे गावाचं सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे गावाच्या वरच्या टोकाशी (माथ्याशी) असलेलं हे श्रीब्राहमण्देव मंदिर| सहयाद्रीच्या पायथ्यापाशी वसलेल्या या गावाचं मंदिर म्हणजे गावाची शान आहे. मंदिरात काळ्या दगडाची श्रीशंकराची रूजीव पिंडी आहे| मुळातच हे मंदिर केव्हा बांधले गेले ते सांगता येत नाही| कारण ते अतिप्रााचीन आहे. या मंदिराची पुनश्च बांधणी जिर्णोध्दार 1989– 90 साली साली स्थानिक नागरिकांनी केली| मंदिरातील श्री शंकराच्या रूजीव पिंडी आहे| येथे मंदिरात स्नान करूनच जावे लागते| मांसाहार किंवा दारू सेवन करून जाण्यास तेथे वज्र्य आहे. माहित असूनही तसे अंहकाराने कोणी मंदिरात प्रवेश केेल्यास देव आपले अस्तित्व काय आहे ते दाखवून देतो| स्त्रियांनीही मासिक पाळीत सात दिवसाची आंघोळ झाल्यानंतरच दर्र्शनाला जाणे पवित्र मानतात| या मंदिराचे जिर्णोध्दार जेव्हा झाले त्यावेळी या मंदिराच्या कLसापासून ते पायथ्यापर्यतच्या इतर सर्व भिंतींना मंदिराला रंगरंगाटी करण्याचे काम मी संतोष सावंत व माझा मित्र सुभाष पालव या आम्ही दोघांनी केले होते| हे काम आम्ही मोबदल्याची अपक्षा न ठेवता मोठया उत्साहाने केले| या वेळी आमचे आदर्श असणारे असे प्रभाकर ढवळ गुरूजी आम्हाला म्हणाले की, “संतोष हे काम तुमच्या हातून होणे हे थोर तुमचं भाग्य समजा| अशी देवाची सेवा करणे सगळ्यांनाच मिळत नसते” आणि खरच आम्ही आजही सुखी समाधानी आहोत.
श्रीब्राहमणदेवाच्या संदर्भात आख्यायिका अशी सागितली जाते कीÊ फार फार वर्षापूर्वी कुडाळ तालुक्यातील घोडगे गावातील एका ‘ढवळ आडनावाच्या शेतकऱ्याच्या गायी चरण्यासाठी म्हणून डोंगरदरीतून नरडवे गांवच्या हद्धीत यायच्या| या लोकांचा शेतीबरोबर दुग्धव्यवसाय हा जोडधंदा मोठया प्रामाणात होता| त्यामुळे या लोकांनी मोठया प्रामाणात गार्इ पाLलेल्या होत्या| अशाच एका दिवशी या गॄहस्थाची एक गाय होती ती व्याल्यानंतर वासराला दूध न देता ती बाहेर जात असे व जंगलातील एका झाडाखाली दगडावर पान्हा सोडत असे|रोज ही गाय कुठे जाते ते पाहण्यासाठी एक दिवस तो गुराखी खांदयावर घोंगड टाकून व कंबरेला आकडी कोयता बांधून तो गार्इच्या मागे आला| गाय एका झाडाखाली झुडुपात ती पान्हा सोडू लागली| हे दॄश्य पाहून त्याने तेथे शोध घ्यायचं ठरविले| ज्या ठिकाणी पान्हा सोडला त्या ठिकाणी आश्चर्याने कोयत्याने तेथे काय आहे हे पाहू लागला| कोयत्याच्या टोकाने माती विस्कटताना कोयत्याचे टोक त्या दगडाला लागून त्याचा तुकडा निघाला| व त्या दगडातून रक्त वाहू लागले| तो घाबरला| नकLत चुकून घडलेल्या या कॄत्याचा त्याला पश्चाताप झाला| त्याने देवाची क्षमा मागितली व नंतर तेथील जागा साप करुन देवाच्या पुजनाचा मान त्याला सर्वप्रथम लाभला. आजमितीस ‘ढवळ हे नरडवे महमदवाडी येथे गावातच सुखवस्तीला आहेत.
दरवर्षाप्रमाणे ‘शिवरात्री’ उत्सव साजरा करतात तसेच सात दिवस “अखंड हरिनाम जागरण सप्ताह’ गांवकरी मोठया उत्सवात करतात| यंदाचा हा वार्षिक सप्ताह जत्रोत्सव 17 फेब्राुवारी ते 23 फेब्राुवारी 2021 पर्यंत आहे| तसेच यंदा अंबादेवीच्या मंदिरात “अखंड हरिनाम जागरण सप्ताह’ जत्रोत्सव 21 फेब्राुवारी ते 27 फेब्राुवारी 2021 पर्यंत आहे. वार्षिक जत्रोत्सवानिमित्त या उत्सवाला मुंबईकर मोठया संख्यने हजर असतात|भाविक आपल्या मनोकामना पुर्ण होण्यासाठी नवस करतात. तसेच भाविक भेटीचे देवाला श्रीफळ ठेवतात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या श्रीब्राहमणदेवाचे आशिर्वाद घेऊन सारेच भक्त आनंदीत होतात
0 टिप्पण्या