कणकवली तालुक्यातील नाटळ गावचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिरात रविवारी माघ शुद्ध नवमीच्या मुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला .

 कणकवली तालुक्यातील नाटळ गावचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिरात रविवारी माघ शुद्ध नवमीच्या मुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला .



कनेडी ( वार्ताहर ) :- कणकवली तालुक्यातील नाटळ गावचे जागृत देवस्थान श्री देव रामेस्वर मंदिरात रविवारी माघ शुद्ध नवमीच्या मुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला . सकाळी ११ वाजता मानकरी , देवस्थान प्रमुख व ग्रामस्थांच्या  उपस्थितीत घटस्थापना करून अखंड हरिनामाचा जयघोष सुरू झाला .

       'जय जय  विठोबा  रखुमाई ' चा जयघोष करत नाटळ ग्रामस्थ अखंड हरिनाम सप्ताहात दंग झाले . गावात चैतन्याचे वातावरण पसरले आहे .सप्ताहा निमित्त श्री देव रामेश्वर मंदिराची सजावट केली असून आकर्षक विद्युत रोषणाई ने मंदिरासह परिसर उजळून निघाला  आहे .

    घटस्थापणे पासून  सात दिवस मंदिरात अखंड हरिनामाचा जयघोष केला जाणार आहे .सह्याद्रीच्या पायथ्याशी व गडनदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात वसलेले श्रीदेव रामेस्वर मंदिर हे जिह्यातील धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे .मंदिरा सभोवती पसरलेल्या मनमोहक गर्द राईमध्ये पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे .परिसर विविध हॉटेल्स व दुकानांनी सजला आहे .

       मंगळवार पासून दररोज रात्री ढोलताशांच्या गजरात श्री देव रामेस्वर माऊलीची मंदिरा सभोवताली पालखी प्रदक्षिणा होणार आहे .  नामवंत भजनी बुवांची भजने ,चित्ररथ ,हरिपाठ ,शाळांचे चित्ररथ , असे  विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत . मंदिरात या वर्षी नाविण्यापूर्ण अशी चलचित्र सहित सजावट करण्यात आली आहे . मंदिर परिसरात विविध शुभेच्या दर्शक फलक ही लावण्यात आले आहेत .जिल्ह्यातील महत्वपूर्ण जत्रांमध्ये नाटळ च्या हरिनाम सप्ताहाची गणना केली जाते .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या