नरडवे येथे शनिवारपासून हरिनाम सप्ताह

नरडवे येथे शनिवारपासून  हरिनाम सप्ताह


◾नरडवे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाईच्या वार्षिक हरिनाम सप्ताहाला  शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी पासून सुरवात *

♦️कणकवली /मिलिंद सावंत : नरडवेे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाईचा वार्षिक हरिनाम सप्ताह शनिवार २१ फेब्रुवारी ते  २७ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. दक्षिणाभिमुख  असलेले हे मंदिर म्हणजे देवीचे शक्तीपीठ मानले जाते. भारतातील निवड दक्षिणाभिमुख मंदिरांपैकी श्री अंबाबाई मंदिर एक आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. अंबाबाईच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी भाविक, सुवासिनींची सप्ताह काळात गर्दी जमते.  

♦️या हरिनाम सप्ताह  निमित्त सोमवारी, त्या नंतर अखंड नामस्मरण, भजने, हरिपाठ, दिंड्या, चित्ररथ. सप्ताह कालावधीत दररोज दुपारी भाविकांसाठी महाप्रसाद व अन्य धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रविवार २८ फेब्रुवारी रोजी या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान संचालक मंडळ व नरडवे ग्रामस्थांनी केले आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या