कविता
मी असो -तसो
हल्ली मी आपलो खय पण बसतंय
जागा गावात थंय बसकान माडतंय
काय हो हसतास कित्याक लय लय
बसतंय म्हणजे इचार करीत बसतंय
तुमका जा वाटता तसा ता काय नाय
मी एकांतात बसान लिवत बसतंय
हल्ली व्याप मीच थोडोसो वाढवलय
मग्न रवान वाईट विचार घालवंतय
नवीन काय सुचला की लिवत बसतंय
इनोदी लिवान इतरांचा मन रमवतंय
खडे काय घडला ते बातमे जमा करतंय
व्हिडीओ बनवून चॅनेलवर दाखवतंय
नवनवीन येगयेगळी गाणी लिवतंय
चांगला संगीत देऊन कान तृप्त करतंय
बरेचसे व्याप मी पाठी लावून घेतलंय
येळ सार्थकी कशी लागात ह्याच बघतंय
समाजसेवेचा वसा असा हाती घेतलंय
मी लहानपणासूनच असो-तसो आसंय
कवी हरीसंतोष
ऊर्फ संतोष गोपाळ सावंत (8779172824 / 9324389918)
१६ जानेवारी २०२१
सकाळी 8 वाजता


1 टिप्पण्या
साहेब खूप छान कविता आहे
उत्तर द्याहटवा