खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने पाथर्ली रोडवरील तिरुपती दर्शन सोसायटीत घरोघरी वाहिनीद्वारे गॅस पुरवठा

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने पाथर्ली रोडवरील तिरुपती दर्शन सोसायटीत घरोघरी वाहिनीद्वारे गॅस पुरवठा



 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अथक प्रयत्नाने पाथर्ली रोडवरील तिरुपती दर्शन सोसायटीत घरोघरी वाहिनीद्वारे गॅस पुरवठा करण्याचे कामे चालू झाले आहे. या कामाचा शुभारंभप्रसंगी विधानसभा संघटक तथा माजी नगरसेवक तात्या माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले.खासदार डॉ. शिंदे यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक प्रफुल्ल देशमुख यांनी घरोघरी वाहिनीद्वारे गॅस पुरवठा कामास पाठपुरावा केला होता.कोरोना महामारी हे काम करता आले नव्हते, मात्र आता या कामाला सुरुवात झाल्याने येथील रहिवाश्यांनी शिवसेनेचे आभार मानले.

    यावेळी शिवसेना कार्यालय प्रमुख सतीश मोडक,महिला शहर संघटक मंगला सुळे,विभागप्रमुख अमोल पाटील,विभागसंघटक प्रतिमा शिरोडकर, शाखाप्रमुख आमोद वैद्य,समीर फाळके, लक्ष्मीकांत अंबरकर, संजय मांजरेकर,यासह विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते. विधानसभा संघटक तथा माजी नगरसेवक तात्या माने म्हणाले, महानगर गॅस माध्यमातून घराघरात गॅस पुरवठा होणार आहे. स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना शिकवलं कि समाजकार्य कसे करावे करावे. याचा शिकवणीतून प्रत्येक शिवसैनिक जनेतची सेवा करतोय. कोरोना काळात पालकमंत्री एकनाथ शिंदे ,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांसह शिवसेना नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी काम करत होते. घरात गॅस सिलेंडरसाठी प्रत्येक महिन्याला साडे सहाशे रुपये खर्च होतात हे प्रत्येक गृहिणीला माहित आहे. मात्र घराघरात गॅस पुरवठा होणार असल्याने घरातील बजेटमध्ये बचत होईल हे नक्की. शिवसेनेने नेहमीच समाजकार्य हाच उद्देश समोर ठेवून जनतेची कामे केली आहे. कोरोना काळात नागरिकांना धान्याच्या कीट वाटप केले होते.म्हणूनच माझी नागरिकांना विनंती आहे कि, जनतेने समाजकार्य करणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी उभे रहावे. तर महिला शहर संघटक सुळे म्हणाल्या, शिवसेना जे आश्वासन देते त पूर्ण करते. कोरोना काळात शिवसेनेने नागरिकांसाठी काम करत होती.नागरिकांच्या सेवेसाठी शिवसैनिक तत्पर असतात.शिवसेनेची शाखा नेहमी जनतेसाठी सदैव खुली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या