कविता : पित्तर आमावशा



कविता : पित्तर आमावशा



मी आज माझ्या आईच्या भाबडेपणावर खुपच चिडलो होतो. 

आईने, माझ्या मेलेल्या बापासाठी पित्तर आमावशाचे ताट तयार केले होते.

मला म्हणाली, जा ! तुझ्या, बापाला हे जेवण चारुण ये , 

काहीतरी आदत होती त्याले ते पण दाई ये !  

मी, आईकडे नुसता बघत राहीलो. 

मला म्हणाली जा ! लवकर 

नाहीतर तो दुसरासन वाढलेले ताट शिवेल 

आदत होती त्याले भारी जठे चांगले दिसे तठेच जाये !

मी बुचकाळ्यात पडलो ?

काय ? खरोखर माझा बाप येईल का ? 

वाढलेले ताट खाईल का ?

फकघाई-घाई मा ताट गच्चीवर ठेव ! 

थोडस, काव काव करीसन मन्हा बापले बलाव

देखस तर काय बराच कावळा जमी गयात ! 

पण कुणीच ताटले शिवाले होईना तयार..

मन्ह, मनमा एक शक्का ई गई  काय आज ही मन्हा बाप दुसरासन घर जेवण करीसन येई..

तेवढामा आईना आवाज उना! उना, का नही ? तो आज ही का तथाच राहीना, 

मी आई म्हटले ?

बघना ग.आई आजु कसा मन्हा बाप येत नही.

आई म्हणे, थोडी दारु ओत त्यामा 

त्यान बरोबर मटना तुकडा ठेव.

विडी-काडी नको, विसरु बा ? 

नाहीतर तो स्वंप्नात सतविल माले वरीसभर ...

मी दारुन घोटन बरोबर थोड चांखण भि ठेव,

विडी-काडी कसा विसरु आईने सांगितल्यावर..

तेवडामा बराज कावळा जमी गयात 

पण यामाई मन्हा बाप कोणता तेच माले समजेना 

मी आईले म्हटले हि तर बरीच गर्दी शे..

यामाई मन्हा बाप कोणता हिच मोठी पंचायत शे

आई म्हणे,तो मित्रसले ही लई उना होई,

त्याणी जुणी सवय आजु सोडी नही .

आई म्हणे,मार त्यासले दगड सगळाच पई जाईत 

जो,तुन्हा खरा बाप होई तोच जेवण करीसन जाई 

दगड मारताच दोन-चार कावळा उडी गयात

पण देखसतर काय ? ताटमा दोन-तिन झन जेवण करीसन गयात.....  

मी आईले म्हटले,बस कर गं आई ही तुझी अंध श्रद्धा पुढच्या वरीसले सांग तू माले पित्तर,पित्तर आमावशाले माझा मेलेल्या बापाला गौरा मधून काढून तुझ्या पुढ्यातच हुभे करेन  

                              कवी - भटू हरचंद जगदेव

                                मो. नं - 9860031839

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या