देशभक्तीपर गीतांची ऑनलाईन स्पर्धा संपन्न

                                            

 देशभक्तीपर गीतांची ऑनलाईन स्पर्धा संपन्न





 पनवेल दि. 20/8/2020 (श्रीनिवास काजरेकर)

भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर एकल गीत स्पर्धेचे आयोजन केले. त्याला पनवेल परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात  श्रीरंग केतकर याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.  पद्मजा कुलकर्णी व केतकी ओक यांनी द्वितीय आणि आशा जांबेकर यानी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. वैशाली केतकर, वर्षा खेडकर व निधी जांबेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.  सुदर्शन जोशी याला स्वरचित उत्कृष्ठ  पोवाडागायनासाठी विशेष पारितोषिक देण्यात आले. 

 ज्येष्ठ शास्त्रीय संगीत अभ्यासक मिलिंद गोखले, गायक व संगीतकार मंदार भिडे आणि शास्त्रीय गायिका मधुरा सोहोनी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सूर, ताल, भाव, उच्चारण आणि सादरीकरण अशा निकषांवर स्पर्धा संपन्न झाली. मिलिंद गांगल यांनी स्पर्धेचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले. गुगल मीटवर संपन्न झालेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, कमांडर दीपक जांबेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यानी अथक परिश्रम घेतले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या