
माफ करावं एकदा तरी,
थोडा विचार करावा ?
चूकतो माणूस कधीतरी,
थोडा कानाडोळा करावा ?
जमलेस तर
श्र्वास रोखून ठेव तसाच
आणी ठिबकत ठेव ओल
अंतस्थ मनातल्या गाभाऱ्यातल्या जखमेची
वेदनेचा विचारच करायला नको,
हे घडले तुझ्या माझ्या संगनमताने
आणी फुंकर कशाला घालू मी,
तूझ्या मनाच्या नाजूक परिस्थितीवर
यातना तर भोगाव्या लागतील
देहाचे खेळणं झाल्यावर
तेव्हा विद्रोह करुन उठेल तुझं मन
निखळून निघेल तुझा एक एक अवयव.
त्या पौर्णिमाच्या चांदण्या सारख्या
या दोन मांड्यांमधलं विश्वाचा जन्म माझा
त्या पवित्र योनीचा
रक्ताच्या थेंबात शोधणारी
इथली विकृत मनोवृत्तीचा कण मी
मग कशाला ओढावून द्याव्या बंदुकीचा चाप
आणी कशाला करावा शिरच्छेद
निसर्गाने निर्माण केलेल्या भावनाना यातना
अजूनही मित्र म्हणतेस तर
बाजुला सार स्त्री, पुरुष
जगूया आपण एक माणूस म्हणून
उत्तर देण्याचे असते तर तेव्हाच दिले असते
संभोगाच्या स्वर्ग सुखात लोडताना !
भटू हरचंद जगदेव
1 टिप्पण्या
मान संपादक मालक संतोष सावंत यांचे आभार
उत्तर द्याहटवा