ढग फाटले आणि धरणीवर आपटले
कोसळ धारांच्या वर्षावानं श्रावणही लाजला।
कधी ना घडलेला विक्रम मोडून काढला।।
मुंबई शहरा पाठोपाठ, ठाणे शहरातील कल्याण डोंबिवलीतही मंगळवारीच्या रात्रीपासून पावसाने जी धो धो बॅटींग एकसारखी सुरुवात चालू केली होती ती त्याने क्षणभराचीही विश्रांती न घेता चालूच होती, मुसळधार पावसाच्या सरी एकसारख्या एका मागोमाग एक येतच होत्या. थोड्या वेळेची ही विश्रांती न घेता रात्रीच्या किट्ट काळोख्या अंधारात वीजेच्या साजशृंगारात आणि ढोल-ताशांच्या आवाजाप्रमाणे ढगांचा आवाज येत होता. तो शांत न बसता पुन्हा पुन्हा समुद्राला उधाण यावं याप्रमाणे तुटून मोठा आवाज करीत चाळींच्या व बिल्डिंगच्या छतावर आणि जमिनीवर तो कोसळतच होता. मंगळवारी च्या रात्रीपासून ते सकाळी 6 वाजे पर्यंत पावसाची संततधार चालूच होती. श्रावण मासातल्या या पावसाने एवढ्या वर्षात असा कधी विक्रम केला नसावा. एवढ्या मोठ्या मुसळधार सरींनी श्रावण महिन्याचे स्वागत करावे असे कधी इतिहासात झालेले नसावे. एवढा असा उधणलेला पाऊस ४ तारिख च्या रात्रीपासून ५ तारिख च्या सकाळी 6 वाजेपर्यंत कोसळत होता.
हरिसंतोष✍️
0 टिप्पण्या