अजूनही दुर्लक्षितच राहिले देशासाठी लढणाऱ्या योद्ध्यांचे स्फूर्तिस्थळ

 अजूनही दुर्लक्षितच राहिले देशासाठी लढणाऱ्या योद्ध्यांचे स्मृतिस्थळ



 


        देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांचे डोंबिवली पूर्व गर्डा सर्कल येथे संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव असे स्फूर्तीस्थळ आहे

         देशाचे चांगले नागरिक होण्यासाठी ज्यांच्याकडून प्रेरणा व देशप्रेम ही शिकवण घेण्यासारखी  असते त्या सैनिकांच्या आठवणी पासूनच समाज व तरुण पिढी दूर गेल्याचे दिसत आहे या स्फूर्तीस्थळाच्या आजूबाजूला कॉलेज व शाळा मोठ्या प्रमाणात असून तेथील तरुण वर्ग व जनताही आजूबाजूला गार्डन मध्ये ये-जा करताना दिसतात मात्र भावी पिढीसाठी असलेले आदर्श घेण्यासाठी स्फूर्तीस्थळाकडे पावले  वळताना  दिसत नाही हे आजच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्या दिनादिवशी सुद्धा दुर्लक्षित होताना दिसत आहे याबाबत ची जनजागृती व पुढाकार सामाजिक संस्था शाळा कॉलेजेस यांनी घेतल्यास हे स्फूर्तीस्थळ देशप्रेम जागवत  ठेवल्यास अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊ शकते व त्यातून भावी पिढीला देशासाठी काम करण्याची प्रेरणा मिळू शकते असे सामाजिक कार्यकर्ते कवी संतोष सावंत व डॉक्टर अमित दुखंडे यांनी निदर्शनास आणून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या