रे कान्हा अडवू नको ना

 रे कान्हा अडवू नको ना


रे कान्हा अडवू नको ना, मज सोड लवकरी।
नको करू मस्करी ही रीत नाही बरी ।।धृ।।


आम्ही जातीच्या गौळणी,। 
विकितो दही दूध लोणी ।।
बिगी बिगी जाता मथुरा बाजारी, का अडविशी वाटेवरी ? ।।१।।


आम्ही गोकुळ च्या नारी ।
पाणी भरीतो यमुनातीरी ।।
घडा भरुनी येता माघारी, का अडवून पदर धरी? ।।२।।


आम्ही गौळ्यांच्या पोरी।
नहाती डोहाभितरी ।।
वस्त्रे लपवूनी पाहतो हरी, का बसुनी कदंबावरी? ।।३।।

असा कसा हा नटखट कान्हा।
तरी संतोष देई आम्हा।।
गौळणी सांगती एकमेकींना, त्याची अजब लीला न्यारी ।।४।।


© कवी,गीतकार,गायक : हरिसंतोष उर्फ संतोष गोपाळ सावंत 8779172824
(11/8/2020)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या