कविता- पाहुणा 'हरी' (11/8/2020)

 

कविता- पाहुणा 'हरी' 

xxxxxxxxxxx

आज माझ्या घरी
आला पाहुणा 'हरी'
करू द्या ना मला
त्याची थोडी चाकरी II धृ II


पाहुणा माझा
साधा नि भोळा
आवडतो जरी 
त्याला लोण्याचा गोळा
मायेने खातो 
माझ्या कष्टाची भाकरी..
आज माझ्या घरी
आला पाहूणा हरी II १ II


हळूच येऊन माझ्या 
सांगतो कानात
तपासाठी जाऊ नको
दूरवर रानात
आहे माझा 'वास'
प्रत्येकाच्या अंतरी...
आज माझ्या घरी
आला पाहूणा हरी II २ II


कवी- सुनील शिवराम काजारे, 
(शिक्षक/कवी/पत्रकार)
नालासोपारा (पूर्व).



------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या