शिंदेवाडी स्टॉप वरून तीव्र चढावर काळाचा घाला; अपघातामुळे राज्य मार्गावरील वाहतुकीची कोंडी
पुसेगाव तालुका खटाव येथील घटना सातारा पंढरपूर राज्य मार्गावर एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुसेगाव पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कटगुण शिंदेवाडी स्टॉप च्या पुढे तीव्र चढावर हा अपघात मोटरसायकल वरील दोघांचा मृत्यू झाल्याची सांगण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राज्य मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर आजाराची एसटी बस क्रमांकMH14MH1348 सातारा सोलापूर मार्गावर धावत होती शिंदेवाडी स्टाफ पास केल्यानंतर तीव्रचनाच्या ठिकाणी बस जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकल अशी धडक झाल्याचे सांगण्यात येते आहे
धडकीची तीव्रता इतकी होती की मोटरसायकल वरील दोघे सुमारे 35 फूट अंतरावर फेकले गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची सांगितले जात आहे.
मात्र, मृत्यू व्यक्तीची नावे अपघातीचे नेमके कारण आणि घटनाक्रम याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नसल्याने संबंधित पोलिसांकडून पुष्टी होणे आवश्यक आहे
एसटी बस चालक वाहक घटनास्थळावरून प्रसार वाहतुकीची कोंडी
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकाची गर्दी जमली एसटी बस आणि मोटर सायकलच्या अपघातामुळे सातारा पंढरपूर राज्य मार्गावरील वाहतुकी अडथळा निर्माण झाला असून वाहनाच्या रांगाला लागल्याची माहिती आहे
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा मृतदेहाची ओळख पटविणे आणि वाहतूक सुरळीत करण्याची कारवाई करणे अपेक्षित आहे या प्रकरणात संबंधित पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकेल.
तीव्र चळ आणि राज्य मार्गावरील सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर
सातारा पंढरपूर राज्य मार्गावरील अवजड वाहने, एसटी बसेस आणि दुचाकीची सतत वर्दळ असते. अशा मार्गावर तीव्र चढ अपुरी दृश्यता किंवा रस्त्यावरील संभाव्य अडथळे असल्यास वाहनचालकासाठी धोका वाढू शकतो त्यामुळे या अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळाची पाहणी करून रस्त्यावरील सुरक्षिततेच्या उपायोजनाचा आढावा घेणे आवश्यक आहे या परिसरात रोडच्या साईटला अपघाताच्या सुरक्षेसाठी बोर्ड लावणे गरजेचे आहे सुरक्षेचे उपाय म्हणून राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूने धोका पत्करणारे चिन्ह लावले नाही मात्र या दुर्घटनेला नेमकी कोणती कारण कारणीभूत ठरेल हे पोलीस तपासणी अधिकृत माहिती समोर आल्यानंतर स्पष्ट होईल प्रशासन मी तातडीने लक्ष देण्याची गरज या दुर्दैवी घटनेमुळे दोन कुटुंबाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला असल्याची भावना व्यक्त होत आहे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे मृताची ओळख पटविणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि अपघाताचे कारण निष्पक्षपणे तपासणी याला प्राधान्य देणे गरजेचे आहे
बातमीदार: बापुना आत्राम
पत्रकार प्रतिनिधी लोकसत्यवाणी न्यूज सातारा

0 टिप्पण्या