मुंबई प्रतिनिधी : आजच्या संगणकीय, इंटरनेट आणि AI च्या युगात शिक्षणाबरोबर समाजसेवेला सुद्धा अनन्या साधारण महत्व आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणा बरोबर समाजाला उपयुक्य अश्या सर्वच विभागाचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे असे मार्गदर्शन प्राध्यापिका सौ. माधुरी घार्गे-काळभोर यांनी आदर्श शिक्षण समितीने लोअर परेल येथे नुकताच आयोजित केलेल्या 65 व्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात काढले. या वेळी शांताराम गोवळकर यांना 80 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी उपस्थितानी प्रार्थना केली. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष - सुरेश पवार यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे, विद्यार्थ्यांचे व पालकाचे स्वागत केले. समितीची प्रस्थावना करताना गेल्या 64 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना समितीचे तहहयात विश्वस्थ - शांताराम गोवळकर यांनी आदर्श शिक्षण समितीसाठी फार मोठे योगदान दिलेले आहे. त्यांनी या समितीच्या आर्थिक व सामाजिक भरभराटी साठी तन, मन, धन अर्पन केलेले आहे. सेक्रेटरी - भारत पाटणकर यांनी पाहुण्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुणे दत्ताराम दळवी यांनी आदर्श शिक्षण समितीच्या रूपाने लावलेल्या या झाडाला शांताराम गोवळकर यांनी आर्थिक खतपाणी घालून मोठे केले आहे.
त्यानंतर शांताराम गोवळकर यांनी सांगितले की माझे सहकारी कै. शंकर पाटणकर यांचे सहकार्य मोलाचे होते. समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना ह्या समितीचे पुढील कार्य व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयकर उपायुक्त - हरीश केळकर, अधीक्षक - प्रकाश पवार, रमेश पवार हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला. तर चिन्मयी पाटणकर - आर्किटेक्ट, मृण्मयी पाटणकर व चिन्मय पाटणकर हे एम. बी. ए. झाल्याबद्दल व 10 वी मध्ये कु. प्रांजला वाडेकर - 92 टक्के व साक्षी शिरकार - 73 टक्केने पास झाल्याबद्दल स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पहिली ते नववी मध्ये उत्तम गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. तर उपस्थित पालकांना भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचलन अनंत दाभोळकर यांनी केले.

.jpeg)

0 टिप्पण्या