डोंबिवली प्रतिनिधी: दिनेश हुमणे, विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षी आपापल्या रेल्वेच्या डब्यात विजयादशमी हा सण जोरदार पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही हा सण साई भजन मंडळ (डोबिवली- दिवा ) यांनी अतिउत्साहीत आणि जल्लोषात साजरा केला. यावेळी वारकरी परंपरा जपत या मंडळाचे अध्यक्ष श्री. अंकुश बोरगे बुवा यांनी एक देश, एक गणवेष असे दाखवून दिले. उपाध्यक्ष श्री. प्रविण मेढेकर बुआ यांनी प्रवासाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले, यांचवेळी साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र युट्युब चॅनेल आणि डिजिटल मीडियाचे डोंबिवली प्रतिनिधी श्री. दिनेश हुमणे यांचा सत्कार अध्यक्ष अंकुश बोरगे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डोंबिवली स्थानकचे रेल्वे मास्तर, रेल्वे पोलीस अधिकारी, आणि मोटरमन यांचाही सत्कार करण्यात आला.
भजन मंडळाचे अध्यक्ष श्री. अंकुश बोरगे यांनी भजनाच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करून भजन परिसर दुमदुमून टाकले. प्रत्येकाचे पाय या गाडीकडे आकर्षण करीत होते. गाडी पूर्णपणे हार, फुगे, पताके, लावून पारंपारिक पद्धतीने सजविली होती, नारळ वाढवून गाडीची आणि देवीची पूजा, आरती केली जाते. यंदा पूजेचा मान श्री. दिपक कांबळे आणि संतोष वनगे यांना मिळाला. हा रोजचा येण्याजाण्याचा प्रवास सुखकर व्हावा याचे गाऱ्हाणे घालण्यात सर्व भजन आणि प्रवासी हातभार लावत असतात, यावेळी विकास हळदवणेकर, उमेश घरवे, राकेश गायकवाड, विजय वर्दम, अशोक शिंदे, सचिन बेलकर, प्रशांत नारकर, सुदर्शन सांगले, नितीन देवकर, दिंगबर बच्छाव, श्रीकांत रामाने, संतोष निकम, सुभाष केंजळे, कृष्णा साळवी, सुरेश मोरे,नंदकिशोर आग्रे, कालिदास गायकवाड, प्रमोद पाटील, सुधीर सावंत, सत्यम मिरगळ, अभिजीत घाग,आणि या भजन मंडळात महिलांचा समावेश आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता. आदी मंडळी उपस्थित होती. आणि अश्याप्रकारे ७.२९ डोंबिवली ते सीएसटी प्रवासाने विजयादशमी साजरी झाली.

0 टिप्पण्या