नवचैतन्य सामाजिक विकास संस्था आणि सशक्त महिला बचत गटातर्फे क्षितिज मतीमंद मुलांच्या शाळेतील मुलांना केले खाऊचे वाटप.* शाळेच्या अध्यक्षा अनिता दळवी यांच्याशी संतोष सावंत यांनी घेतली मुलाखत


डोंबिवली पश्चिम कडील जुनी डोंबिवली येथे असलेली क्षितिज संचालित क्षितिज मतीमंद मुलांच्या शाळेत मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर 2026 रोजी महाभोंडला कार्यक्रम शाळेच्या वतीने करण्यात आला होता., त्यावेळी नवचैतन्य सामाजिक विकास संस्था आणि सशक्त महिला बचत गट यांच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. तेथे मुलांच्या अभ्यासातील व कलेतील प्रगतीचा आढावा लोकसत्यवाणी न्यूज चे प्रतिनिधी प्रकाश कदम आणि संस्थेचे अध्यक्ष आणि लोकसत्यवाणी न्यूज चे संपादक,पत्रकार, कवी संतोष सावंत यांनी घेतला. सर्व मतीमदं मुले ही कलेमध्ये हुशार दिसली.  संतोष सावंत यांनी त्या मुलांचे कौतुक केले. तसेच बचत गटाच्या अध्यक्षा समिधा सावंत, सचिव दिक्षा चाळके, ज्योती नर, सुवर्णा देशमुख, स्नेहांकिता सावंत व इतर संस्थेच्या व बचत गटाच्या महिलांनी मुलांना खाऊंचे वाटप केले.
त्यानंतर संतोष सावंत यांनी शाळेच्या अध्यक्षा माजी महापौर अनिता दळवी मॅडम व त्यांच्या सहकारी यांची मुलाखत घेतली.  निवेदिका हरिप्रिया दांडेकर सहित  संतोष सावंत लोकसत्यवाणी न्यूज डोंबिवली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या