राजापूर : राजापूर तालुक्यातील भालावली येथील पिशेदवाडी परिसरात सुहास ओणकर यांच्या घराशेजारी तब्बल १५ फुटी भला मोठा अजगर आढळून आल्याने परिसरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले. या अजगराला सर्पमित्र विवेक घाटे आणि ओमकार घाटे यांनी पकडले.
घराशेजारी एवढ्या मोठ्या आकाराचा अजगर आढळल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. अजगर दिसून आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी सर्पमित्र विवेक घाटे व ओमकार घाटे यांना पाचारण करण्यात आले. दोन्ही सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून अजगराला पकडले.
अजगरासारखे वन्यजीव मानवी वस्तीजवळ आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा वेळी सर्पाला पकडण्याचा किंवा त्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येते.
दरम्यान, भालावली पिशेदवाडी येथे आढळलेल्या या भल्या मोठ्या अजगराची परिसरात चर्चा सुरू आहे.
छाया : रवि जाधव

0 टिप्पण्या