श्री एकविरा देवस्थान कोतापूर येथे नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी; दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.


श्री एकविरा देवस्थान कोतापूर येथे नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी; दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
---------------------------------------------
राजापूर : (प्रतिनिधी रविंद्र जाधव): श्री एकविरा देवस्थान कोतापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आई एकविरा देवी नवरात्रौत्सव २०२६ मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
           या नवरात्रौत्सवानिमित्त दररोज देवीची पूजा, आरती, भजन, महिला टिपरी नृत्य, डबलबारी, रासगरबा आदी कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे. पहिल्या माळेपासून विविध भजन मंडळे व महिला मंडळे आपली कला सादर करणार आहेत. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी महाप्रसाद व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवव्या माळेला ओपन फॅन्सी ड्रेस व रासगरबा कार्यक्रम रंगणार आहे. नवरात्रौत्सवाची कार्यक्रम रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे. 

पहिल्या माळेला रविवार, ११ ऑक्टोबर रोजी स्थानिक भजन श्रीकृष्ण राणे, नरेश मंचेकर व संतोष तखन यांचे भजन होणार आहे. दुसऱ्या माळेला सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी श्री लक्ष्मीकेशव भजन मंडळाचा कार्यक्रम व आरती होईल. तिसऱ्या माळेला मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी भिंगेवाडी व पडयारवाडी महिला टिपरी नृत्य व डबलबारी, तर चौथ्या माळेला बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी आग्रेवाडी महिला टिपरी नृत्य कला सादर करणार आहेत. पाचव्या माळेला गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी रिया मेस्त्री व तेजल जाधव यांची डबलबारी, सहाव्या माळेला शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी मोंडेवाडी व खडकवली महिला टिपरी नृत्य कला, तर सातव्या माळेला शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी महाप्रसाद, हळदी-कुंकू व पिशेदवाडी-जोगलेवाडी महिला टिपरी नृत्य व डबलबारीचे आयोजन करण्यात आले आहे. आठव्या माळेला रविवार, १८ ऑक्टोबर रोजी कुंभारवाडी भजन पैकडे, तर नवव्या माळेला सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी ओपन फॅन्सी ड्रेस व रासगरबा कार्यक्रम होणार आहे.
     या दहा दिवसांच्या उत्सवात सर्व देवीभक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. उत्सव जल्लोषात तसेच शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. भाविकांनी यथाशक्ती देणगी देऊन उत्सवाच्या आयोजनात आपले योगदान द्यावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या