जागरण : शिक्षण क्षेत्राचा दीपस्तंभ !

                         नुकतेच जेष्ठ साहित्यिक भारत सातपुते यांचे "जागरण' आत्मचरित्र हाती लागले आणि थोडे डोळे फाडुन वाचू लागलो; 
जागरणचे असे बरेच अर्थ आपल्याला करता येतील किंवा मांडणी 
करता येईल असे  मला वाटते. पहिले आपण जागरण म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे 

जागरणाचा अर्थ असाही होऊ शकतो. जागरण म्हणजे रात्रभर 
जागे राहणे; पण या शब्दाचा अर्थ केवळ झोप नघेणे एवढाच नाही. त्याचे वेगवेगळे अंगाने अर्थ आपल्याला स्पष्ट करता येतील. 
       
१ सामाजिक जागरण: समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद,अन्याय, शोषण आणि रूढी, परंपरा यांविषयी लोकांमध्ये जाणीव निर्माण करणे.जागृती निर्माण करणे व तसेच त्या जाणीवा जनमानसांच्या मनामनात रूजवणे त्यांना या साऱ्या वाईट गोष्टी पासून अलिप्त 
ठेवणे त्याला या अर्थाने आपल्याला जागरण म्हणता येईल. 
      
२ वैचारिक जागरण: माणसाने स्वतः विचार करायला शिकणे, सत्य-असत्य ओळखणे आणि विवेकाने निर्णय घेणे. लेखक स्वतः हाडाचा शिक्षक असल्याने त्यांनी बरेच विद्यार्थी यांना घडविले आहे तेवढेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत, आपला शिक्षक वर्ग यांच्या हक्कांसाठी अतोनात मेहनत घेतल्याचे आपल्याला ही आत्मचरित्र वाचतांना आपल्याला दिसून येते हे मात्र सूर्य प्रकाशा 
इतके सत्य आहे. 
     
३ मानसिक जागरण: स्वतःच्या हक्कांची, कर्तव्यांची आणि जीवनातील जबाबदाऱ्यांची जाणीव होणे. तसेच माणूसकी माणसात असली की, त्याला दुसऱ्यांची हक्का बद्दल सांगावे लागत नाही. तो जीव ओतून ते काम करत असतो. त्याची मानसिकता कुणीच बदलू शकत नाही. तो त्याला दुसऱ्यांची हक्काची जाणीव त्याचा 
मनात रूजत असल्याने तो सहजपणे ते करत असतो. 
     
४ सांस्कृतिक जागरण: आपल्या संस्कृतीतील चांगल्या मूल्यांचे 
जतन करणे आणि कालबाह्य, अन्यायकारक परंपरांवर प्रश्न उपस्थित करणे. मत कुणाचे का असेना पण जागरणाचा सर्वांत व्यापक अर्थ म्हणजे माणसाच्या मनात विचारांची ज्योत पेटवणे. 
तसेच लेखक भारत सातपुते, यांच्या सामाजिक आणि वैचारिक 
लेखनाच्या संदर्भात सांगायचे तर, जागरण म्हणजे माणसाला 
केवळ झोपेतून उठवणे नव्हे, तर अज्ञान, अंधश्रद्धा अन्यायाच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढणे. यालाच आपण खऱ्या अर्थाने वैचारिक जागरण म्हणू  शकतो. 
    
५आध्यात्मिक जागरण: स्वतःचे जीवनाचा अर्थ, मनाची अवस्था, दुःखाचे स्वरूप आणि मानवी अस्तित्व यांविषयी सखोल चिंतन 
करणे म्हणजे आध्यात्मिक जागरण होय. यासाठी धार्मिक श्रद्धा 
असणे आवश्यक नाही. विवेक, आत्मपरीक्षण आणि प्रज्ञेच्या माध्यमातूनही हा शोध घेता येतो. 
        
""शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे आणि हे जो प्राक्षण करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही'' हे वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उगाचंच उदघोषीत केले नाही, ते तावून सुलाखून निघाले, त्यांनाबऱ्यांच गोष्टींसमोर जावे लागले बऱ्यांच अडचणींना तोंड द्यावे लागले तेव्हा कुठे माणसं जागृत होऊ लागली आणि मग बऱ्यांशा लोकांनी नाही तर लाखो लोकांनी डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेला 
मार्ग आपलासा करून शिकू लागले आहे आणि शिक्षण घेवून नोकरी करत आहेत. तसेच लेखक भारत सातपुते यांनी शिक्षण घेवून शिक्षक झाले आणि त्यातूनच त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठा अमृल 
बदल घडवून सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक, मानसिक, आध्यात्मिक मधून बदल घडवून आणले आहेत. 
     
जेष्ठ साहित्यिक भारत सातपुते  यांनी आपल्या आत्मचरित्रातून शिक्षणा विषयी एक मोठी खंतही व्यक्त केली आहे ती अशी ते म्हणतात की, ""मला एका गोष्टीचेआश्चर्य वाटते ते म्हणजे घरेदारे, शेती.जागा विकतात, हे विकत घेतात हे माहीत आहे. गरीब लोक शेळ्या विकतात हे ही ज्ञात आहे पण आधुनिक शिक्षण महर्षी 
शाळा विकतात, शाळा विकत घेतात हा सध्याचा सर्वात मोठा उद्योग बनला आहे. 

""भारत स्वतंत्र झाला आणि भारतात संविधान लागू झाले, त्यातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला जे लोक शिक्षणापासून  वंचित होते, दुर होते. आता त्यांचे दारे खिडक्यांना शिक्षण दस्तक देवू लागले आहे पण आजही सर्व सामान्य लोकांच्या घरा 
पर्यंत शिक्षण खऱ्या अर्थाने पोचले नाही. काही धनदांडग्यानी शिक्षणावर आपली मक्तेदारी आहे असे भासवून लोकांना शिक्षणापासून दुर ठेवले आहे आणि त्याच लोकांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे असे लेखक यांनी प्रत्यक्ष अनुभव घेवून आपली खंत व्यक्त  केलेली आपल्याला दिसून येते. सरकारी शाळांमध्ये शिक्षक आपले जीवाचे रान करून मुलांना शिकवत असतात त्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचा विकास व्हावा म्हणून धडपडत असतात पण होते काय  मराठी शाळेचे शिक्षक कितीही चांगले शिकवत असले तरी त्या शिक्षकाला खाजगी शाळेवाले त्यांना दोष देत असतात. त्यांना बदनाम करत असतात.अशा वेळी पालक वर्ग खाजगी शाळेकडे काना डोळा करून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात आपल्याला दिसून येते. तसेच लेखक भारत सातपुते यांच्याकडे हंगामी वसतिगृहाचा विभागही होता. दरवर्षी ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांन विषयी  त्यांच्या मनात तळमळ होती. मुले आपल्या आईवडिलांच्या सोबत ऊसतोडणीसाठी गेली तर त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल असे त्यांना वाटत राहते. कारण ज्या माणसाच्या मनात रक्ताच्या 
कणा कणात मनाच्या गाभाऱ्यात बुद्ध वसतो, श्रीछत्रपती शिवाजी महाराज वसतात, महात्माफुले, डॉ. आंबेडकर असतो, त्यांच्या 
अंतःकरणात  समतेची ज्योत पेटते, त्याच शिक्षकांच्या मनात  दुसऱ्याच्या स्वप्नाची कळकळ असते, तळमळ असते, असेच   शिक्षक मुलांच्या भविष्याचे विचार करत असतात त्या पैकी लेखकभारत सातपुते सर होय.
        
आत्मचरित्र म्हटले तर त्यात आपल्या जीवनातील प्रत्येक सत्य  घडलेली गोष्टींना त्यात मांडावे लागते. काही-काही वेळा सत्य मांडल्यामुळे आपल्या जवळची माणसं आपल्या पासून दूरावली जात असतात.जेष्ठ साहित्यिक डॉ. किशोर शांताबाई काळे व उचल्याकार जेष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड या लेखकांनी आपल्या  आत्मचरित्रात सत्य मांडले म्हणून अनेक नातेवाईक इतर लोक 
नाराज झाले व काही लोक आपल्यावर डुक धरून असतात. सत्य  खूपच कडु असते आणि ते पचायला जड जात असते सातपुते 
सरांनी आपल्या आत्मचरित्रातून सत्य तर मांडले आहे ते कुणाचे 
मन दुखवू नये याची देखील काळजी घेतली आहे, आणि जागरण  वाचल्याने आपल्या मनाचे भावविश्व खुलून येते सहज आपल्याला  त्याचे मर्म कळून चुकते. 
         
जागरण वेगवेगळ्या भावविश्वात रमणारे भिषण वास्तव्य आहे, 
विधायक कामाचा लेखाजोखा आहे, शिक्षकी पेशात फोफावलेल्या दुष्प्रवृत्ती, समस्यांवर उपायसुचवले आहेत, गौरावची बाब,  अनुभवाची शिदोरी, आदर्श संस्कारांचा शिक्षक सत्यवादी भावना  आणि सखोल प्रवास आहे, सुट्या असून सुट्यांचा उपयोग न  करता डोक्यावर पुस्तके घेऊन फिरणारा व पुस्तकांवर प्रेम 
करणारा वेडापिसा लेखक आहे, कॉपी म्हणजे देशाला खिळखिळीकरणारी किड आणि संकटांना फाट्यावर मारणारा सातपुते सर 
आनंद कशात असतो आणि तो कसा साजरा करायचा असतो. 
मुलांना घेऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे त्यांच्याकडून सर्वकरुन घेणे यात रममाण होणारे सातपुते सर शेवटी सर म्हणतात की, ""असे म्हणून कसे चालेल? प्रयत्न थांबवू नये. आपण आपलेकर्तव्य करावे. डोंगरदऱ्यातून सूर्य वर येतोच ना? माळावर काट्याकुट्यात उगवूनही फुलांनी कधी फुलायचे "जागरण' सोडले काय?श्र्वास आहे तोपर्यंत ते सुवास देतातच ना!'' ""शिक्षण क्षेत्रात दिपस्तंभ म्हणजे जागरण आहे. देशासाठी जागरणाचा वसा  घेवून संघर्षाची तमा न बाळगता सतत कार्यरत राहून आपल्या पेशासी तरी किमान इमान बाळगून आपले आपण तरी सत्याच्या मार्गाने चालत माणुसकीचा स्वर्ग निर्माण करण्याची दृष्टी व सृष्टी जागरण आहे.'' हे जागरण सर्व सामान्य माणसाचे नक्की आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 
                                   लेखक-   भटू हरचंद जगदेव 

                                  भिवंडी, ठाणे  (98600 31839)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या