तरुणाईचा संताप वाढतोय… सरकारने वेळीच शहाणे व्हावे!

तरुणाईचा संताप वाढतोय… सरकारने वेळीच शहाणे व्हा!
आज देशातील ‘Gen Z’ तरुणाईचा आवाज अधिक तीव्र होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तरुण रस्त्यावर उतरून आपल्या प्रश्नांसाठी आणि मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. ही परिस्थिती सरकार आणि प्रशासनासाठी निश्चितच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे.
गेल्या अनेक दशकांच्या काळात आपण आंदोलने पाहिली; मात्र आजच्या तरुणाईमध्ये दिसणारा संताप, अस्वस्थता आणि आंदोलनाची तीव्रता वेगळ्या पातळीवर जाणवत आहे.
काही ठिकाणी संतप्त आंदोलकांकडून पोलिसांच्या वाहनांची तोडफोड होत आहे, तर काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होताना दिसत आहे. परिस्थिती आणखी चिघळली तर पोलिसांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो आणि आंदोलक तरुणांच्याही आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
लाठी-काठीचा सामना करण्याची वेळ तरुणांवर येत आहे आणि काही ठिकाणी तरुण पोलिसांच्या हातातील काठ्या हिसकावून घेत असल्याचे चित्र दिसत आहे. हे चित्र निश्चितच चिंताजनक आणि भविष्यासाठी धोक्याचा इशारा देणारे आहे.
आजचा तरुण केवळ आंदोलन करत नाही; तो प्रश्न विचारतोय, उत्तर मागतोय आणि आपल्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करतोय.
जर ही अस्वस्थता वाढतच गेली आणि देशातील ही तरुणाई एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली, तर परिस्थिती नियंत्रणात ठेवणे प्रशासनासाठीही मोठे आव्हान ठरू शकते.
म्हणूनच सरकारला आणि सर्व राजकीय नेत्यांना एक नम्र विनंती—
तरुणाईच्या संयमाचा अंत पाहू नका!
मुलांचा संताप वाढण्याआधी त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या.
संवादातून मार्ग काढा, प्रश्न समजून घ्या आणि योग्य तोडगा काढा.
कारण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळीच शहाणपणाने निर्णय घेणे अधिक चांगले.
आजची तरुणाई देशाचे भविष्य आहे. तिचा आवाज दाबण्यापेक्षा तो समजून घेण्याची गरज आहे.
🙏 सरकारने वेळीच शहाणे व्हावे…
आणि देशातील तरुणाईच्या मनातील असंतोष गांभीर्याने समजून घ्यावा!

लेखक : संतोष सावंत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या