क्षण जुने आठवून
आज मन भरून आले
सोबत घालवलेले दिवस
सोनेरी होऊन गेले
निरोप फक्त आजच्या
या दिवसापुरता आहे
आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर तसेच
कवीगण, साहित्यप्रेमी रसिकहो आणि ओतूरच्या माझ्या बंधू-भगिनींनो.
सर्वांना सप्रेम नमस्कार
श्रावणाच्या पावसाळी वातावरणात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आपल्या ओतूर नगरीत "श्रावणधारा काव्य महोत्सव" च्या चौथ्या वर्षात आपणा सर्वांचे स्वागताध्यक्ष म्हणून स्वागत करताना मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे.
श्रावण म्हणजे केवळ पाऊस नाही, तर तो भावनांचा, नात्यांचा आणि निसर्गाचा सण आहे. या महिन्यात जशी आकाशातून धार बरसते, तशीच शब्दांची धार देखील माणसाच्या मनाला भिजवत असते. या विचारातूनच "श्रावणधारा" हा उपक्रम आपण सुरू केला. आज ४ वर्षांनी तो वटवृक्ष झाला आहे.
यंदा या महोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ६२ कवी आपल्या कविता घेऊन आले आहेत. प्रत्येक कविता म्हणजे एक वेगळी श्रावणधारा आहे. काही कविता प्रेमाच्या आहेत, काही सामाजिक भानाच्या आहेत, तर काही निसर्गाच्या सान्निध्यातील आहेत. आपल्या रसिकांनी देखील तितक्याच तृप्त मनाने, शांततेने आणि टाळ्यांच्या गजरात या कवितांचा आस्वाद घेतील. हा प्रतिसादच आमच्या कष्टाचे खरे फळ आहे.
हा महोत्सव यशस्वी होण्यामागे आपल्या आयोजन मंडळाचे मोठे योगदान आहे. आमचे अध्यक्ष श्री. राजेश साबळे, कार्याध्यक्ष श्री. सुरेश डुंबरे, उपाध्यक्ष डॉ. खं. र. माळवे आणि सचिव डॉ. प्रविण डुंबरे, सहसचिव श्री. संजय गवांदे, खजिनदार श्री. रणजित पवार आणि सहखजिनदार श्री. नागेश हुलावळे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
शेवटी मी आलेल्या सर्व कवी, रसिक, पत्रकार बंधू आणि सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे मनापासून आभार मानतो. आपण दिलेल्या प्रेमामुळेच "श्रावणधारा" अशीच पुढेही बरसत राहील, असा विश्वास आहे.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत.
धन्यवाद!
जय महाराष्ट्र
डाॅ.खं.र. माळवे


0 टिप्पण्या