मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवार , दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर

*बृहन्मुंबई महानगरपालिका*

*जनसंपर्क विभाग*

_दिनांक ५ जुलै २०२६_


*मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवार , दिनांक ६ जुलै २०२६  रोजी सुटी जाहीर*
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. 

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

***
(जसंवि/२६२)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या