अनेक पिडितांच्या समस्या सोडविण्याचे काम श्वास सामाजिक संस्था नेहमीच करते.!



                              -- अविनाश  म्हापार्ले, अध्यक्ष

-------------------------------------------

  मुंबई :-- ' दान देणारा गर्विष्ठ होणार नाही आणि दान घेणारा लाचार होणार नाही. ' याचे भान प्रत्येक संस्थेने ठेवले पाहिजे. कारण " देणारा नेहमीच सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा अडचणीच्यावेळी दिलेला मदतीचा हात असो. " अशाच प्रकारे ' श्वास सामाजिक संस्थेने ' गरीब वं गरजू विध्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजातील पीडित, गरजू वं गरीब जनतेला मदतीचा हात देऊन त्यांना मोकळा श्वास घेण्यास मदत केली आहे. आजपर्यंत अनेक पीडिताच्या समस्या सोडविण्याचे काम या श्वास सामाजिक संस्थेने केलेले आहे.

               रविवार  दिनांक 05 जुलै रोजी भिवंडी तालुक्यातील मोरणी या शाळेसह आजूबाजूच्या दुधनी - वापे, घाडणे, इजारीपाडा, करमाळे वं देवचोळे या अतिदुर्गम गावाच्या  शाळेतील 200 गरजू वं गरीब विध्यार्थ्यांना दप्तर, छत्री, शाळेचा ड्रेस, वह्या वं पेन पेन्सिल देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित मोरणी गावचे राहिवाशी आणि विध्यार्थ्यांना जेवण दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाना शिरसाट यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. संस्थेने वांगणी येथील तारांगण या मतिमंद मुलांसाठी विविध उपकारणे, चिपळूण येथील पूरग्रस्थाना आर्थिक, शैक्षणिक मदत, भाष्करबाबा वृद्धाश्रमात कपडे, जेवण व उपयुक्त वस्तूंचे वाटप, विक्रमगड येथील गरजू व होतकरू विध्यार्थ्यांना लॅपटॉप वं संगणकाचे वाटप आणि महारक्तदान शिबिराचे आयोजन असे विविध उपक्रम या संस्थेने केलेले आहेत. भविष्यातही श्वास सामाजिक संस्था ने अकेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. " हातात हात घेला तर मैत्री होते, हातावर हात आपटला तर टाळी वाजते, कुणाला हात दिला तर मदत होते, हाताचे महत्व इतकेच आहे की जर अनेक हात पुढे आले अशक्य ते शक्य होते. " म्हणूनच श्वास सामाजिक संस्थेच्या असंख्य हातानी पुढे येऊन या अतिदुर्गम  भागातील गरजू वं गरीब विध्यार्थ्यांना माफ्ट केली आहे. 

            या वेळी भिवंडी तालुक्याचे माजी सभापती - शांतारामदादा पाटील, सरपंच - श्याम गवाने, ठाणे पालघर कोयना प्रतिष्ठानचे - शशिकांत शिंदे वं विपुल पाटील, पोलीस पाटील - राजेश शिंदे, श्वास साजिक संस्थेचे अध्यक्ष - अविनाश  म्हापार्ले, सचिव - जगदीश उबारे, खजिनदार - संदीप देसाई कार्यक्रमाचे आयोजक - प्रकाश कदम, किंगजॉर्जच्या शिक्षिका - मृणाल भारती,  श्वास सामाजिक संस्थेचे सभासद,  मोरणी गावातील राहिवाशी वं पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्वास च्या सर्व सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार मोठी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या