अपूर्व चॅरिटेबल ट्रस्टतर्फे टिटवाळा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना वस्त्र वाटप





टिटवाळा, दि. १३ जुलै २०२६ : सामाजिक बांधिलकी जपत अपूर्व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने टिटवाळा येथील केडीएमसीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वस्त्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

शाळेचे मुख्याध्यापक साबळे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत सुमारे १०० विद्यार्थी हे आदिवासी पाड्यातील असून त्यांना शालेय पोशाखाची नितांत गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष रविंद्र क. शा. गुरचळ यांच्या पुढाकारातून विश्वस्त सुहास राणे, जितेंद्र गुरचळ, आरती गुरचळ आणि उर्मिला कांबळे यांनी १३ जुलै २०२६ रोजी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना अंगावरील पोशाखांचे वाटप केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या अॅड. नलिनी गायकवाड यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना जितेंद्र गुरचळ यांनी केली.

यावेळी संस्थापक-अध्यक्ष रविंद्र गुरचळ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, "शिक्षणासाठी आवश्यक असलेली कोणतीही मदत अपूर्व चॅरिटेबल ट्रस्टकडून करण्यात येईल. विद्यार्थ्यांना कोणतीही गरज भासल्यास त्यांनी आपल्या शिक्षकांमार्फत कळवावे. ट्रस्ट त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या