सुप्रसिद्ध अभिनेते व लोकप्रिय "डिस्को डान्सर" मिथुन चक्रवर्ती यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त भव्य "संगीतमय महोत्सवा" चे आयोजन

 



सुप्रसिद्ध अभिनेते व लोकप्रिय "डिस्को डान्सर" मिथुन चक्रवर्ती यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आर. के. म्युझिकल कराओके स्टुडिओ, परळ यांच्या वतीने सायन येथील गोकुळ ऑडिटोरिअममध्ये भव्य "संगीतमय महोत्सवा" चे आयोजन 




नुकताच १६ जून २०२६ रोजी सुप्रसिद्ध अभिनेते व लोकप्रिय "डिस्को डान्सर" मिथुन चक्रवर्ती यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आर. के. म्युझिकल कराओके स्टुडिओ, परळ यांच्या वतीने सायन येथील गोकुळ ऑडिटोरिअममध्ये भव्य "संगीतमय महोत्सवा" चे आयोजन करण्यात आले.





सामाजिक कार्यकर्त्या व गायिका डॉ. रेवती कृष्णा आळवे यांनी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, कवी, गीतकार, पत्रकार तसेच स्क्रीन रायटर्स असोसिएशन मुंबईचे सभासद  आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या संघाचे आजीव सभासद शब्दश्री विलास जी देवळेकर यांना विशेष आमंत्रण दिले होते. या प्रसंगी विलास देवळेकर यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटांच्या नावांवर आधारित स्वतः लिहिलेला विशेष लेख आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत डिस्को म्युझिकल इको साऊंड सिस्टीममध्ये लेखाचे सादरीकरण केले. उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. 



यानंतर सर्वश्री भूपेंद्र राठोड, जाकीर तांबोली, प्रकाश पेडणेकर,  विजय सुरती, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश कनगुटकर, जागेश्वर राठोड, विवेक जाधव, हरजीवन मकवाना, प्रशांत चव्हाण, रमेश लोहाना, सुनील चौधरी, चंद्रकांत शिंदे, डॉ. रवी गुप्ता आणि सर्वसुश्री डॉ. रेवती कृष्णा, जया परमार, श्रीलक्ष्मी सावंत, प्रेरणा नाईक, रेणुका चिपळूणकर,  प्रिया गुप्ता, अनुपमा जैन, किर्ती राठोड या सर्व  गायक-गायिकांनी कोणताही ब्रेक न घेता एकापाठोपाठ एक मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटांतील गाणी सुमधुर आवाजात सादर केली. या संगीत महोत्सवाला सर्व चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महान कलाकार श्री मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांनी हा ७६ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि संगीताच्या सुरेल वातावरणात दिमाखदार पद्धतीने साजरा केला.  या संगीतमय कार्यक्रमाचे संचालन श्री भूपेंद्र राठोड यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या