कोतापूर प्रतिनिधी : मोहंमद मोनये,
माजी सरपंच विजय सुतार यांच्या संघर्षातून उभी राहिलेली बससेवा आजही ग्रामस्थांचा आणि विद्यार्थ्यांचा आधारवड. कोतापूर गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच मा. श्री. विजय परशुराम सुतार यांच्या प्रदीर्घ लढ्यातून साकार झालेल्या 'कोतापूर-रत्नागिरी' वस्तीच्या एसटी बसने आज आपल्या सेवेची २८ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने आज, २२ जून २०२६ रोजी मारुती मंदिर, घुमेवाडी (कोतापूर) येथे या बसचा २८ वा वर्धापन दिन ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.
असा होता बस सेवेचा संघर्षमय प्रवास. ही कायमस्वरूपी बस सेवा सुरू करणे अजिबात सोपे नव्हते. १९९६-९७ च्या काळात श्री. विजय सुतार यांना यासाठी प्रशासनाशी मोठा संघर्ष करावा लागला. आपल्या गावासाठी एसटी मिळावी म्हणून त्यांना मंत्रालयात तब्बल दोन वेळा उपोषणाला बसावे लागले. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर २२ जून १९९८ रोजी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि ही बस सेवा सुरू झाली. या प्रवासात तेरवणचे सुपुत्र तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. अनंत चव्हाण आणि 'लांजा एसटी आगार' यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आज २८ वर्षांनंतरही ही बस कोतापूर आणि परिसरातील प्रवासी तसेच विद्यार्थी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुढील ध्येय लवकरच 'कोतापूर ते नालासोपारा' बस धावणार !सामाजिक कार्याचा अखंड वसा घेतलेले श्री. विजय सुतार आता थांबलेले नाहीत. भविष्यात 'कोतापूर (मारुती मंदिर, घुमेवाडी) ते नालासोपारा' ही नवीन थेट बस सेवा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी संबंधित एसटी खात्याशी त्यांचा पत्रव्यवहार पूर्ण झाला असून, त्यांच्या या नव्या प्रयत्नांनाही लवकरच मोठे यश मिळेल, अशी आशा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. यावेळी या वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडीतील ती लक्षणीय ठरली. यावेळी श्री. केशव जानस्कर, श्री. सुनील नवरे, श्री. अरविंद भातडे, श्री. दत्ताराम मंचेकर, श्री. सुरेश घुमेग्रामस्थ आणि मुलांनी मोलाचे योगदान दिले. या सोहळ्याला राजापूरचे माजी सभापती श्री. अभिजीत तेली यांची प्रमुख उपस्थि, श्री. दत्ताराम घुमे, सौ. दुर्गी जानस्कर, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या