राष्ट्रवादीचे चेंबूर तालुकाध्यक्ष दिपक सावंत यांचे निधन !

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे चेंबूर तालुका अध्यक्ष आणि घाटले परिसरातील आदर्शवादी व्यक्तिमत्त्व 
दिपक शशिकांत सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले.ते ५१  वर्षांचे होते.त्यांच्या निधनाने संपूर्ण चेंबूर  परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

दीपक सावंत यांनी चेंबूर परिसरातील  शेकडो अंध ,अपंग,निराधार,विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला होता.  आपल्या छोट्याशा कार्यालयात बसून सातत्याने लोकांच्या समस्या सोडविण्यात ते मग्न असलेले दिसायचे.त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी   गोवंडी- देवनार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्ययात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस रवींद्र पवार आणि बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सर्व स्तरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.दिपक सावंत यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या