डोंबिवली पश्चिम उमेश नगर मार्केट यार्ड मध्ये तृतीय पंथीयांची दमदाटी; गरीब भाजीपाला विक्रेते त्रस्त

लोकसत्यवाणी न्यूज 
विशेष प्रतिनिधी-बापुना आत्राम 


डोंबिवली पश्चिम येथील उमेश नगर मार्केट यार्ड मध्ये सध्या तृतीय पंथीयांकडूनं सुरू असलेल्या अरे रवी, दमदाटी आणि दादागिरीमुळे छोट्या मोठ्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हातावर पोट असलेल्या गरीब भाजीपाला विक्रेत्यांचे 
जगणे कठिणझाली असून, "आम्हाला या त्रासातून मुक्त करा,"अशी आर्थ हाक व्यापारी वर्गाकडून प्रशासनाला देण्यात येत आहे? 

उमेश नगर मार्केट यार्ड हे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाचे भाजीपाला बाजार म्हणून ओळखले जाते. रोज सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक छोटे विक्रेते डोक्यावर, हातगाडीवर किंवा छोट्या टोपल्या मधून भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून इथे काही तृतीय पंथीयांकडून व्यापाऱ्यांना 
त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने सामोर येत आहे त स्थानिक विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात येणाऱ्या तृतीय पंथीयांकडून 
जबरदस्तीने पैसे मागितले जातात, पैसे देण्यास नाकार दिल्यास शिवीगाळ, दमदाटी, ग्राहका समोर अपमान आणि दुकान बंद पाडण्याच्या धमक्या दिल्या जातात, त्यामुळे आधीच महागाई, कमी विक्री आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या छोट्या व्यावसायिकांचे मानसिक संतुलन ढासळत आहे.
"आम्ही दिवसभर उन्हात उभे राहून दोन वेळेच्या जेवणासाठी मेहनत करतो. पण रोज कोणी येऊन दमदाटी करून पैसे घेऊन जात असेल तर आम्ही जगायचं कसं?"असा संताप सवाल एका महिला भाजी विक्रेत्यांने व्यक्त केला. तर काही दुकानदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अनेक वेळा भीतीपोटी त्यांनी प्रशासन कडे तक्रार करण्याची टाळलं 

मोठे दुकानदार असते किंवा छोटी फेरीवाले, सर्वच व्यापारी या त्रासाला कंटाळले असून मार्केट यार्ड मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे, व्यापाऱ्याचे म्हणणे आहे की, बाजारपेठेमध्ये ग्राहकासमोर अशा प्रकारची दादागिरी होत असल्याने व्यवसायावर ही परिणामी होत आहे? काही ग्राहकांनी तर या वातावरणामुळे बाजारात गेली कमी केली असल्याचे बोलले जात आहे. 
दरम्यान, मार्केट यार्ड प्रशासन आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधितावर योग्य कारवाई करावी, बाजार परिसरात नियमित व्यस्त वाढवावी आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून केली जात आहे. 

गरीब आणि कष्टकरी विक्रेत्यांच्या घामाच्या कमाईवर कोणी अन्याय करू नये,; अशी भावना आता व्यापारी वर्गातून तीव्रपणे व्यक्त होत आहे. 
प्रशासनाने वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे 

आता प्रश्न असा निर्माण होत आहे की, डोंबिवली पश्चिम उमेश नगर मार्केट यार्ड मधील या वाढत्या दादागिरी वर प्रशासन अंकुश लावणार का? 
गरीब विक्रेत्यांना न्याय मिळणार का¿याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या